Take a fresh look at your lifestyle.

ऐकावं ते नवलंच! ‘पश्चाताप दिन’ साजरा करण्यासाठी सुट्टी द्या, पोलीस कर्मचाऱ्याचा अजब अर्ज

0
maher

छगन जाधव, ओटीटी न्यूज नेटवर्क

अमरावती : जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्यात एक अजब गजब प्रकार घडला आहे. आणि या प्रकाराची चर्चा संपूर्ण पोलिस दलात आता रंगू लागली आहे. पोलीस अंमलदाराने चक्क पश्चाताप दियानिमित्त १ दिवसाची सुटी हवी असल्याचा अर्ज ठाणेदारांकडे केला आहे. या विशेष विनंती अर्जाची सध्या पोलीस दलात चर्चा होते आहे.

अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगिर पोलीस ठाण्यात कार्यरत विनोद राठोड या पोलीस अंमलदाराने २९ मार्च रोजी लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे २७ मार्चची साप्ताहिक रजा २९ मार्चला बदली करून द्यावी अशी विनंती केली आहे.

वाचा अर्जात काय म्हटलं

विशेष म्हणजे सुट्टीसाठी हव्या असलेल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या कारणासमोर कंसात पश्चाताप दिन असा उल्लेख केला. अर्जाची ही प्रत सर्वत्र व्हायरल होत असून पोलीस दलासह सर्वत्र या विनंती अर्जाची चर्चा होते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.