Take a fresh look at your lifestyle.

राज्यात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वीज पुरवठा कंपनी स्थापन होणार;देशातील पहिला अभिनव प्रयोग

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना व इतर घरगुती ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी वीज वितरण (Electricity Distribution) कंपनींना तारेवरची कसरत करावी लागते. इथे मुख्य बाब अशी की कृषी वीज ग्राहकांना १ रुपये प्रति युनिट दराने वीज देऊनसुद्धा अनेकदा या विजेचे बिल भरण्यास ते टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. सध्या औष्णिक (Thermal )व इतर विद्युत प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जाते, यामध्ये आता सौरऊर्जेद्वारे (Solar Energy) वीज निर्मितीची भर पडणार आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वीज पुरवठा कंपनी ‘महाराष्ट्र कृषी वीज वितरण कंपनी’ लवकरच स्थापन केली जाणार असून, याद्वारे शेतकऱ्यांना साधारणतः ३ रुपये प्रति युनिट प्रमाणे वीज पुरवठा केला जाणार आहे.

गहू आयातीची आवश्यकता नाही; केंद्र सरकारची स्पष्टोक्ती

महाप्रीत म्हणजेच महात्मा फुले नूतनीय ऊर्जा व पायाभूत सुविध तंत्रज्ञान कंपनीच्या पुढाकाराने राज्यात ५ हजार मेगावॉट वीज निर्मिती क्षमतेचे तीन सौर ऊर्जा वीज प्रकल्प उभारले जाणार असून, याद्वारे शेतकऱ्यांना अखंड व माफक दरात वीज पुरवठा केला जाणार आहे. यामुळे महावितरणवरील भार कमी होण्यास मदत मिळेल. महाप्रीतच्या या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांच्या थकबाकीचा प्रश्न निकाली निघेल व शेतकऱ्यांचा विजेचा सुरळीत पुरवठा देखील होईल. देशातील हा पहिला अभिनव प्रयोग असून महाराष्ट्रात सर्वप्रथम राबविण्यात येणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.