Take a fresh look at your lifestyle.

भारतीय तरुणाचा प्रेरणादायी जीवनप्रसंग; ६०० ईमेल्स व ८० कॉल्सनंतर मिळाला यशाचा राजमार्ग

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : जीवनात काही जणांना यश सहजासहजी प्राप्त होते तर काही जणांना अनेक खाचखळग्यातून जात यशाला आलिंगन करण्याची करण्याची संधी मिळते. परंतु एका भारतीय तरुणाला यश मिळविण्याची केवळ जिद्दच नव्हती तर तळमळीने ते प्राप्त करण्याची त्याने तयारी दाखवली व अखेर त्याला यश देखील मिळाले. ही गोष्ट आहे, वत्सल नाहाटा नावाच्या तरुणाची ज्याने अमेरिकेत नोकरी मिळविण्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल ६०० ईमेल्स व ८० कॉल्स केले होते व शेवटी त्याच्या प्रयत्नाला यश मिळाले. सध्या वत्सलचा हा जीवनप्रसंग लिंकडिनवर चांगलाच वायरल होत असून अनेकांना यातून प्रेरणा मिळत आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित

वत्सलने त्याचे शिक्षण अमेरिकेतील येल विद्यापीठातून पूर्ण केले होते, परंतु शिक्षण झाल्यानंतर मूळ प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे नोकरी मिळविण्याचा. शिक्षण पूर्ण झाल्यांनतर वत्सलने विविध जागी नोकरीकरिता प्रयत्न केले परंतु त्यावेळी अमेरिकेत नोकऱ्यांमध्ये मंदीचे सावट होते. अनेक जणांना हाती असलेली नोकरी गमवावी लागली होती. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केवळ अमेरिकेतील नागरिकांनाच नोकरीवर ठेवण्यात येणार असल्याचे फर्मान काढले होते त्यामुळे अनेक भारतीय तरुणांसमोर मोठे संकट उभे राहिले होते.

शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; आज कशी असेल बाजाराची स्थिती?

अशा परिस्थितीत वत्सल नाहाटा या तरुणाने सुरुवातीपासून जागतिक बँकेत नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघितले होते. त्यासाठी त्याने बँकेला अनेकदा ईमेल्स व फोन कॉल्स केले परंतु दरवेळी नकार मिळत गेला. अशावेळी या पठ्ठ्याने हार न मानता एक दोन नव्हे तर ६०० ईमेल्स व ८० कॉल्स केले व शेवटी त्याला नोकरीची संधी देण्यात आली. आज वत्सल नाहाटा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेत (IMF) कार्य करत आहे, जी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत अशी संस्था आहे.

यावेळी वत्सलने विशेष करून भारतीय तरुणांना मोलाचे मार्गदर्शन करताना सांगितले की, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी अडचणींमध्ये न डगमगता, हार न मानता प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवावे. आज आंतरराष्ट्रीय संस्थेत कार्य करताना मला अनेक गोष्टी शिकायला मिळत आहे व हाच अनुभव मला आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करणार असल्याचे मत त्याने व्यक्त केले. जे लोक आयुष्यात थोड्याफार अपयशाने हार मानतात त्यांच्यासाठी वत्सलचा हा जीवनप्रसंग नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. कठोर संघर्ष व अथक प्रयत्न करणाऱ्यांकरिता सर्वच शक्य होत असते हे या तरुणाने दाखवून दिले आहे. भारतासारख्या देशात नेहमी बेरोजगारीचा प्रश्न उभा राहतो तेव्हा अशा तरुणांचे उदाहरण समर्पक ठरते.

‘माफी मागा, अजून बरंच बाहेर निघेल’; भाजपाचा आदित्य ठाकरेंना इशारा

कठीण परिस्थितीत देखील जिद्द व चिकाटीच्या जोरावर यशाचा प्रदेश पादाक्रांत करता येतो हा संदेश या तरुणाच्या संघर्षाने दिला आहे, त्यामुळे वत्सल प्रत्येक संघर्ष करणाऱ्या भारतीय तरुणांसाठी आयकॉन ठरत आहे, तसेच समाजमाध्यमांवर त्याचा यशाचा प्रवास चर्चेचा विषय ठरत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.