Take a fresh look at your lifestyle.

Andrew Symonds क्रिकेटविश्वाला मोठा झटका! प्रसिद्ध क्रिकेटपटूचा कार अपघातात मृत्यू

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू (Former Australian cricketer) अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) याचं निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री टाऊन्सविले येथे झालेल्या कार अपघातात सायमंड्सचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायमंड्सला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले पण त्याला वाचवता आले नाही. या अपघातात सायमंडला गंभीर दुखापत झाल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

VIDEO केतकी चितळेच्या तोंडाला फासलं काळं, राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचा दणका

सायमंड्सचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सच्या कारला शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये अपघात झाला. या अपघातात सायमंड्स निधन झालं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाऊन्सविलेजवळ सायमंड्सच्या कारला अपघात झाला. त्याची कार एलिस नदीच्या पुलावरून बाहेर आली आणि खाली पडली. सायमंड्स स्वतः कार चालवत होते. स्थानिक आपत्कालीन सेवांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला. आता फॉरेन्सिक क्रॅश युनिट त्याच्या अपघाताची चौकशी करत आहे.

IPL 2022 : पराभवानंतरही दिसली महेंद्रसिंग धोनीची जादू, एका कृतीनं जिंकलं सर्वांचं मन!

विशेष म्हणजे सायमंड्सची कारकीर्द चमकदार होती. त्याने 198 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5088 धावा केल्या आहेत. यादरम्यान सायमंड्सने 6 शतके आणि 30 अर्धशतके झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये अष्टपैलू कामगिरी करताना त्याने 133 विकेट्सही घेतल्या आहेत. त्‍याच्‍या नावावर 26 कसोटीमध्‍ये 1462 धावा आहेत तसेच 24 विकेटही आहेत. सायमंड्सने 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. देशांतर्गत सामन्यांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे.

🤩सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

अँड्र्यू सायमंड्स 1998 ते 2009 या काळात ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा भाग होता. यादरम्यान, स्टीव्ह वॉ आणि नंतर रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली कांगारू टीम अजिंक्य मानला जात होता. सायमंड्सने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 26 कसोटी, 198 एकदिवसीय आणि 14 टी-20 सामने खेळले. त्याच्या नावावर कसोटीत 1462, वनडेमध्ये 5088 धावा आणि टी-20 मध्ये 337 धावा आहेत. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये 165 विकेट्स घेतल्या आहेत. आक्रमक शैली आणि मैदानावरील उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यासाठी तो ओळखला जात असे.

🔥आता PF खात्यात किती रक्कम जमा झाली हे घसबसल्या ‘या’ सोप्या पद्धतीने तपासा

आपल्या क्रिकेट कारकिर्दीत चांगल्या कामगिरीसोबतच सायमंड्स वादांमुळेही चर्चेत राहिला होता. सायमंड्स आणि हरभजन सिंग यांच्यातील 2007-08 मध्ये झालेला वाद आजही लक्षात आहे. हे प्रकरण मंकीगेट म्हणून ओळखले जाते. या प्रकरणात सायमंड्सने भज्जीवर वांशिक टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. प्रकरण इतके वाढले होते की सिडनी कोर्टापर्यंत पोहोचले होते. ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन कर्णधार रिकी पाँटिंगने स्टीव्ह बकनर आणि मार्क बेन्सन या पंचांकडे भज्जीची तक्रार केली होती.

खुशखबर! आता केवळ 600 रुपये महिन्याची बचत करून बनू शकता करोडपती; अशी करा सुरुवात

Comments are closed.