Anganwadi Bharti 2023 Maharashtra | अंगणवाडीत 20 हजार जागांसाठी मोठी नोकर भरती होणार

0

Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस मिनी पदासाठी राज्यात मोठी नोकर भरती होणार आहे. याबाबत राज्य सरकारच्या वतीने घोषणा करण्यात आली असून, तब्बल 20 हजार अधिक जागांसाठी भरती होणार आहे. अंगणवाडी भरती म्हटले की येथे 100 टक्के महिलांना प्राधान्य असते. म्हणजेच अंगणवाडीमध्ये महिलांची भरती केल्या जाते.

 

Maharashtra Anganwadi Bharti 2023

 

राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती सुरु करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

 

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजार 186 पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून ही नोकर भरती प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीसांची रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभागाने मान्यता दिली आहे. (Maharashtra Anganwadi Sevika Bharti 2023)

नाशिक जिल्हा अंगणवाडी भारती अर्ज नमुना 

ग्रामीण भागातील महिलांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. गावातील महिलांना आपल्याच गावात नोकरी मिळविण्याचे स्वप्न करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत अंगणवाडी भरतीचा निर्णय घेण्यात आला.

अर्ज प्रक्रिया व उपलब्ध जागा येथे पहा 

Leave A Reply

Your email address will not be published.