Take a fresh look at your lifestyle.

विनायक मेटेंसारखा पुन्हा अपघात; ‘या’ मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीचा मृत्यू

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीला १४ ऑगस्ट रोजी अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता अशाच एका अपघाताची आणखी एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांचे ओएसडी मोतीलाल सिंह (OSD Motilal Singh) यांचाही अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

बस्ती जिल्ह्यातील मुंडेरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खजौला (khajaula) येथे हा अपघात झाला. नीलगाय वाचवण्याच्या नावाखाली हा अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारी स्कॉर्पिओ कारचे नियंत्रण सुटून झाडाला धडकली. या स्कॉर्पिओमध्ये मोतीलाल सिंग, त्यांची पत्नी आणि चालक होते.

कोरोनाचा राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम; एकूण ६८ हजार कोटींचे कर्ज व ४१ हजार कोटींची महसूल तूट

ओएसडी मोतीलाल सिंह काही कामानिमित्त लखनौला निघाले होते. या अपघातात ओएसडी मोतीलाल सिंह यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी गोरखपुर मेडिकल कॉलेजमध्ये (Gorakhpur Medical College) दाखल करण्यात आले आहे. मोतीलाल सिंग यांच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये नियुक्त सार्वजनिक सामान्य निवारण अधिकारी / OSD मोतीलाल सिंह यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला. गोरखपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदावरून निवृत्त झाल्यानंतर मोतीलाल सिंह हे गोरखनाथ मंदिरात जात जाऊन लोकांच्या समस्या ऐकून घेत असत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.