Take a fresh look at your lifestyle.

डीजे बुक करून ठेवा! एप्रिल महिन्यात ‘या’ 5 राशींसाठी आहे लग्नाचा योग

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : कोणतेही शुभकाम काम करायचे असेल तर, हिंदू धर्मात अगोदर शुभवेळ पाहिली जाते. लग्नासारख्या अत्यंत महत्त्वाच्या समारंभासाठी सर्वोत्तम मुहूर्त काढणे महत्त्वाचं मानलं जातं. एप्रिल महिन्यात काही राशींसाठी लग्नाचा योग आहे. या महिन्यात सिंगल असणाऱ्या लोकांचे दोनाचे चार हात होण्याची दाट शक्यता आहे.

एप्रिल महिन्यात लग्नाच्या तारखा दाट आहेत. 15, 16, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 27 या तारखेला विवाह मुहुर्त आहे. असं म्हणतात की, कुंडलीत गुरूचा आशीर्वाद मिळाला तर, विवाह योग तयार होतो. अशा परिस्थितीत एप्रिल महिन्यात काही राशींच्या बाबतीत हा योग जुळून येणार आहे. चला तर मग पाहूयात कोणत्या आहेत या पाच राशी.

ठाकरे सरकार धोक्यात? काँग्रेसच्या गोटातून धक्कादायक माहिती समोर

मिथून – मिथून राशींच्या लोकांसाठी एप्रिल महिना खूप खास असणार आहे. या राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात एप्रिल महिन्यापासून विवाह योग बनत आहेत. ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे त्यांच्यासाठी हा महिना भाग्यशाली ठरेल. आवडता जोडीदार मिळेल.

सिंह – सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच एखादी खास व्यक्ती येवू शकते. एप्रिल महिन्यात या राशीच्या लोकांचे लग्न होण्याची दाट शक्यता आहे. इतकेच नाही तर ज्यांच्या आयुष्यात आधीच कोणीतरी आहे त्यांच्यासाठीही हा महिना खास असणार आहे. जर या राशींचे अविवाहीत व्यक्ती विवाहास इच्छुक असतील तर त्यांचा विवाह होईल.

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा पृथ्वीवरील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर; पहिल्या दहामध्ये भारतातील 4 शहरं

कन्या – प्रेम विवाह करणार असाल तर कन्या राशींच्या व्यक्तींसाठी हा महिना खास आहे. या महिन्यात काही ग्रहांचे संक्रमण अनुकूल परिणाम देईल. या काळात तुम्ही तुमच्या भावी जोडीदाराला भेटाल आणि तुम्ही त्यांच्याशी लवकरात लवकर लग्न करू शकता. ज्या अविवाहित व्यक्तींचे लग्न जुळत नसेल, त्यांना घरबसल्या लग्नाचा योग येऊ शकतो.

कुंभ – वैवाहिक वार्षिक राशीभविष्य 2022 नुसार, हा महिना कुंभ राशींच्या लोकांसाठी खूप आनंदायी असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच तुमचा जीवनसाथीचा शोध संपेल. या काळात तुम्ही तुमच्या भावी जोडीदाराला भेटाल. ज्यांनी अगोदरच जोडीदार शोधून ठेवला असेल, त्यांच्यासाठीही विवाहाचा चांगला योग आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहिल.

मीन – मीन राशीच्या लोकांच्या राशीत एप्रिल महिन्याच्या अखेरीस गुरू प्रवेश करेल. त्यामुळे त्यांच्यासाठी हा महिना खास राहिल. अविवाहित लोकांचे विवाह जुळतील. विवाह योग जुळून येत असल्याने अचानक स्थळप्राप्ती होईल. तसेच आपल्या आवडीनुसार जोडीदारही लाभेल.

आताच खरेदी करा सर्वाधिक लोकप्रिय इलेक्ट्रिक स्प्लेंडर ; सिंगल चार्जमध्ये तब्बल १८० KM पर्यंत रेंज!

(टीप– वरील माहिती धार्मिक तसेच लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. वाचकांच्या आवडीनुसार ती येथे सादर केली आहे.)

Leave A Reply

Your email address will not be published.