Take a fresh look at your lifestyle.

SBI चे ग्राहक आहात? मग व्हा अलर्ट अन् वाचा सविस्तर…

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या करोडो ग्राहकांसाठी अलर्ट मेसेज जारी केला आहे. SBI ने आपल्या ग्राहकांना 2 मोबाईल नंबर बद्दल सतर्क राहण्यास सांगितले आहे. हे क्रमांक फिशिंगसाठी वापरले जात असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. बँक या क्रमांकांवरून पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यास सक्त मनाई करते.

‘या’ योजनेतून महिलांना कर्ज घेणे होणार अधिक सुलभ; भारत सरकारची अभिनव योजना

आसाम सीआयडीने या क्रमांकांबद्दल सर्वप्रथम चेतावणी दिली होती. CID ने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “SBI ग्राहकांना 2 नंबरवरून कॉल येत आहेत, जे त्यांना KYC अपडेट करण्यासाठी फिशिंग लिंकवर क्लिक करण्यास सांगत आहेत. सर्व SBI ग्राहकांना विनंती आहे की, अशा कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.”

‘5G’ सेवा लाँच झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले…

बँकेने दिला दुजोरा

SBI बँकेनेदेखील या ट्विटची पुष्टी केली आणि ग्राहकांना फोन न उचलण्यास तसेच KYC अपडेट लिंकवर क्लिक करण्यास सांगितले. बँकेने अशा लिंक्सपासून केवळ कॉलवरच नव्हे तर एसएमएस, ईमेल इत्यादींपासून सावध राहण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर, तुमची जन्मतारीख, डेबिट कार्ड नंबर, इंटरनेट बँकिंग युजर आयडी आणि पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, सीव्हीव्ही आणि ओटीपी यांसारखे नंबर कोणाशीही शेअर करू नका.

छगन भुजबळांवर मुंबईत गुन्हा दाखल; जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

ही चूक करू नका

याशिवाय तुम्ही तुमचा बँक खाते क्रमांक, पासवर्ड, एटीएम कार्ड क्रमांक किंवा त्याचे फोटो तुमच्या मोबाईलमध्ये ठेवल्यास तुमची माहिती लीक होण्याचा धोका असल्याचे बँकेने म्हटले आहे. यासोबतच तुमचे खाते पूर्णपणे रिकामे केले जाऊ शकते.

ऑक्टोबर महिन्यात बँकांना तब्बल २१ दिवस सुट्ट्या; सणासुदीच्या काळात शेअर बाजार ३ दिवस बंद राहणार

‘या’ पासून सावध राहा

एसबीआय, आरबीआय, सरकार, कार्यालय, पोलीस आणि केवायसी प्राधिकरणांच्या नावाने फोन कॉल्सपासून सावध रहा. तसेच फोनवरील कोणतेही अ‍ॅप किंवा तुमच्या फोनवरील कोणत्याही अज्ञात स्त्रोताकडून कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करू नका. अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या मेल्स आणि मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तसेच सोशल मीडिया किंवा मेसेज आणि फोन कॉल्सवर तुम्हाला मिळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बनावट ऑफरपासून सावध रहा.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.