Take a fresh look at your lifestyle.

काय सांगता? चक्क 400 रुपयांना मिळतोय AC, कुठे आणि कसं? जाणून घ्या…

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – मार्च महिना जवळपास निम्मा संपला असून आता उन्हाच्या झळा लागण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेकांनी आपआपल्या घरात कुलर, फॅन तसेच एसी बसवण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही सुद्धा गरमी पासून बचाव करण्यासाठी घरात एसी किंवा कुलर बसवण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे.

बाजारात एक छोटा आणि दमदार AC विक्रीला आला आहे. Mini Portable AC असं या एसीचं नाव आहे. बाजारात येणारा हा आतापर्यंतचा सर्वात छोट्या आकाराचा एअर कंडिशनर आहे. विशेष बाब म्हणजे या एअर कंडिशनरची खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार नाहीये. अगदी कमी किंमतीत तो तुम्हाला खरेदी करता येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात या छोटू एअर कंडिशनर बद्दल.

असा आहे छोटा AC

तुम्ही या एसी कंडिशनर वर्क टेबल किंवा मुलांच्या स्टडी टेबलवर ठेवू शकता. हे डिव्हाइस छोटं असून, गारवा देण्याचं काम चांगलं करतं. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीनं तुम्ही या डिव्हाइसची खरेदी करू शकता. याची किंमत 400 रुपयांपासून ते 2 हजार रुपयांपर्यंत आहे. हे डिव्हाइस वेगवेगळ्या डिझाइन्स आणि आकारात सुद्धा उपलब्ध आहे. त्यातून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मॉडेल खरेदी करू शकता, जे तुमच्या गरजा पूर्ण करणारं असेल.

डिव्हाइस कसं काम करतं?

या डिव्हाइसचा वापर करायचा असेल तर त्याच्यासाठी ड्राय आइस लागतो. जर ड्राय आइस उपलब्ध नसेल तर तुम्ही थंड पाण्याचा वापरही करू शकता. यामुळे तुम्हाला थंडावा मिळेल आणि तुम्ही बसलेल्या खोलीतही थंडावा तयार होईल. हा पोर्टेबल एसी वापरणं अगदीच सोपं आहे आणि त्याच्यासाठी विजेचा वापरही अगदी कमी होतो.

पैशाचीही होईल बचत

इतकच नाही तर, या डिव्हाइसला वीज देखील कमी लागते. त्यामुळे तुमची पैशांचीही बचत होईल. मग यंदाच्या उन्हाळ्याच्या झळा कमी करण्यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या पर्यायाच्या शोधात असल्यास हा छोटा आणि स्वस्त असा पोर्टेबल एअर कंडिशनर नक्की खरेदी करा.

Leave A Reply

Your email address will not be published.