Take a fresh look at your lifestyle.

आरोग्य सहल : ऑन धिस टाईम अंतर्गत माहेर कट्टा आणि माधवबाग हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ५० महिलांची निःशुल्क आरोग्य तपासणी

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नागपूर : हल्लीच्या धावपळीच्या युगात महिलांना मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपणे अत्यंत गरजेचे असते. अशातच, हल्ली हृदयासंबंधी अकाली उद्भवणारे विविध आजार टाळायचे झाल्यास स्वच्छ वातावरण तसेच वेळीच आरोग्य तपासणी गरजेची असते. महिलांचे आरोग्य जपण्याचा दृष्टिकोन ठेवत ऑन धिस टाईम मीडिया अंतर्गत असणाऱ्या महिलांचे व्यासपीठ माहेर कट्टा सदस्यांकरिता, माधव बाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एक दिवसीय आरोग्य सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार, दिनांक १२ नोव्हेंबर रोजी नागपूर स्थित माधवबागच्या कोंढाळी नजीकच्या सालई येथील हॉस्पिटलमध्ये ही आरोग्य सहल काढण्यात आली होती, ज्यामध्ये ऑन धिस टाईम माहेर कट्टाच्या एकूण ५० महिलांनी सहभाग नोंदविला होता.

भारत जोडो, पदयात्रा नसून एक जनचळवळ; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

ऑन धिस टाईम मीडियाचे अध्यक्ष श्री. संदीप थोरात आणि व्यवस्थापकीय संचालक कांचन बिडवे यांच्या मार्गदर्शनात सदर सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माहेर कट्टा समन्वयक रूपल दोडके, ऑन धिस टाईम मिडीया नागपूर कार्यालयाच्या कार्यकारी समन्वयक मीनाक्षी अड्याळकर आणि अर्चना ढोके यांनी ही आरोग्य सहल यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य दिले. या सहलीच्या निमित्ताने निःशुल्क आरोग्य तपासणीचा लाभ या सर्व महिलांनी घेतला, ज्यामध्ये शुगर, बीपी, ईसीजी व हृदय तपासणी करण्यात आली, तसेच निरोगी हृदय ठेवण्यासाठी महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ; महिलेकडून विनयभंगाची तक्रार दाखल

या आरोग्य सहलीच्या निमित्ताने माधव बाग कडून पाच एकर परिसरात लावण्यात आलेल्या विविध औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांची माहिती या सर्व महिलांना डॉक्टरांच्या चमूकडून देण्यात आली त्यामुळे काही काळ स्वच्छ आणि आरोग्यदायी निसर्गाच्या सानिध्यात वेळ व्यतीत करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली होती. यावेळी चहा, नाश्ता वगैरेची उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली होती. रोजच्या धावपळीतून थोडा वेळ उसंत मिळाल्याने या सर्व महिलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद जाणवत होता, तसेच संगीत खुर्ची व मन ताजेतवाने करणारे खेळ या वेळी आयोजित करण्यात आल्याने त्यामध्ये सहभाग नोंदवत अनेक महिलांनी या सर्वाचा लाभ घेतला.

ट्विटर ब्लू टिकसाठी भारतात मोजावी लागणार इतकी रक्कम; जाणून घ्या याबाबत अधिक माहिती

शिबिराच्या निमित्ताने जमलेल्या सर्व महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आहार विहार, हृदय काळजी इत्यादींबद्दल अधिक माहिती व्याख्यानातून तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूकडून देण्यात आली. यावेळी निःशुल्क तपासणी शिबिरात माधवबागचे डॉ. गौरव शेळके, डॉ. राघवेंद्र सिंह, डॉ. सारिका शेळके, अपेक्षा मानकर, योग शिक्षक निलेश ठाकरे इत्यादींसह आयोजक प्रशांत ठाकरे यांनीआपले सहकार्य देत शिबीर यशस्वी करण्यास योगदान दिले. प्रसंगी आयोजक प्रशांत ठाकरे यांनी जमलेल्या सर्वांचे आभार मानले. ऑन धिस टाईम मीडियाच्या माहेर कट्टा मंचाने या आरोग्य सहलीचे आयोजन केल्याबद्दल सर्व सहभागी सदस्य महिलांनी आभार व्यक्त केले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.