Take a fresh look at your lifestyle.

अर्थविश्व : भारतावर जागतिक मंदीचा प्रतिकूल परिणाम होणार नाही; सेवा व तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांचा विश्वास

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सध्या जगावर आर्थिक मंदीचे संकट घोंघावताना दिसत आहे, विकसित देशांनी जागतिक मंदीचा जणू धसकाच घेतला आहे. जगभरात जाळे असणाऱ्या कंपन्यांनी सध्या कर्मचारी कपातीचे धोरण राबवणे सुरु केले असून प्रत्यक्ष मंदी सुरु झाल्यावर जवळपास दोन ते तीन महिने मंदीचे संकट राहणार असल्याचे भाकीत आर्थिक जगतातून वर्तविण्यात येत आहे. भारताची सध्याची आर्थिक स्थिती बघता भारत जागतिक मंदीच्या संकटात तरणार असल्याचे मत क्वेस कॉर्प या भारतातील सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष अजित आयझॅक यांनी केले आहे.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय; जागतिक बँकेला सहकार्याची साद

येत्या काळात भारतात माहिती तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याची शक्यता वर्तविताना याला कारणीभूत बाबी ५ जी सेवा, केनेक्टिव्हिटी जाळ्याचा व्यापार विस्तार तसेच डिजिटलायझेशन इत्यादी राहणार असल्याचे आयझॅक म्हणाले. एका प्रमुख माहितीला सर्वांसमोर मांडताना आयझॅक म्हणाले माहिती तंत्रज्ञान क्षेत्र प्रत्यक्षपणे ५ लक्ष तर अप्रत्यक्षपणे ५ लक्ष रोजगारांची निर्मिती करते. यामुळे येत्या काळात या बाबीचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर अनुकूल परिणाम होणार आहे, त्यामुळे अर्थव्यवस्था वाढणार आहे. भारताच्या जीडीपी मध्ये काळानुसार वाढ होत असल्याने ही बाब सकारात्मक असल्याचे मत, आयझॅक यांनी मांडले.

डीटीएच आणि केबल चॅनेल दरांबाबत मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ग्राहकांना बिलामध्ये दिलासा मिळणार

आयझॅक यांची क्विस कॉर्प ही कंपनी भारतातील नामांकित कंपनी समजल्या जाते. येत्या काळातील जागतिक मंदीचे संकट निर्माण झाल्यावर भारत यापासून खूप लांब राहणार असून यावेळी महिलांना सुद्धा घरी बसून काम करता येईल असे रोजगार निर्माण होतील असा विश्वास आयझॅक यांनी व्यक्त केला. एकंदरतीच सध्या मोठ्या कंपन्यांमधून नोकर कपात सुरु आहे मात्र भारतात रोजगाराचा ओघ वाढण्याची स्थिती निर्माण होणार असल्याचा विश्वास असल्याने, अशावेळी जर भारताची अर्थव्यवस्था स्थिर राहिली तर जगाचे लक्ष भारताकडे लागणार आहे, हे निर्विवाद सत्य आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.