Take a fresh look at your lifestyle.

अरविंद सावंत-राम सातपुते वादविवाद सोशल नेटवर्किंगवर रंगला; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर शिंदे गटातील आमदारांवर विरोधकांच्या टीका करणे रोजचेच झाले असताना या वादात आता थेट भाजपचा देखील प्रवेश झाला आहे. अस्थिर शिवसेनेची कासावीस चव्हाट्यावर आली असून संजय राऊत तुरुंगात गेल्यानंतर आता शिवसेनेच्या गोटातून आरोप-प्रत्यारोपांची सूत्रे अरविंद सावंतांनी स्वीकारल्याचे चित्र आहे. यापूर्वी जळगाव दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांवर मनसोक्त तोंडसुख घेतले होते, आता भाजपचे युवा आमदार राम सातपुते यांनी उद्धव ठाकरेंना डिवचवल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान राम सातपुते यांनी ट्विट करत,” आधी फाटलेल्या चड्डीला ठिगळ लावा, उगाच आभाळ हेपलायचे धंदे बंद करा” अशी खरमरीत पोस्ट केली होती.

राज्यात १८ हजारांहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त; शिक्षणव्यवस्थेचा बोजवारा अल्प मनुष्यबळावर

नेमक्या याचा ट्विटला प्रत्युत्तर देताना अरविंद सावंत यांनी कोण हे राम हे तर हराम! म्हणत राम सातपुते यांच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. आदरणीय नेत्यांवर टीका करणारे हेच का भाजपचे संस्कार असा आरसा देखील अरविंद सावंतांनी भाजपला दाखविला आहे. ट्विटमध्ये सावंतांनी पुढे नमूद केले की भाजपने राम सातपुते यांच्यावर कारवाई करून दाखवावी अन्यथा देवेंद्र फडणवीस यांनी रामराज्याची भाषा करू नये असा प्रश्न देखील केला आहे.

एकनाथ शिंदे तात्पुरते मुख्यमंत्री; ‘या’ नेत्याचे मोठे भाकीत

येत्या काळात भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या या प्रकरणाचे पडसाद सोशल नेटवर्किंग साईटपुरते मर्यादित असून मोठे नेते प्रत्यक्षात याबाबतीत काय भाष्य करतात हे येणाऱ्या काळात कळेलच.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.