Take a fresh look at your lifestyle.

ऑक्टोबर महिन्यात बँकांना तब्बल २१ दिवस सुट्ट्या; सणासुदीच्या काळात शेअर बाजार ३ दिवस बंद राहणार

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : यंदा विविध सण ऑक्टोबर महिन्यात येत असल्याने बँकांना तब्बल २१ दिवस टाळे लागणार आहे. यामध्ये १ ऑक्टोबरचा अर्धवार्षिक बंद मुळे देखील बँकांना सुट्टी राहणार आहे. याशिवाय दुसरा, चौथा शनिवार सुट्टी तसेच रविवारच्या सुट्ट्यांचा देखील समावेश आहे. या महिन्यात दसरा, दिवाळी, दुर्गा पूजा, छट पूजा येत असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कॅलेंडर नुसार देशातील बँकांना २१ दिवस सुट्टी असणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ९० दिवसांत मुंबईचा कायापालट करण्याचा निर्धार; विकासकार्यांना गती देणार

या सुट्टयामंध्ये काही राष्ट्रीय तर काही प्रादेशिक सुट्ट्यांचा समावेश आहे, त्यामुळे विविध राज्यात सुट्ट्यांमध्ये बदल राहू शकतो. सध्या बँकिंग सेवा डिजिटल झाल्यामुळे पूर्वीसारखा त्रास ग्राहकांना आता अनुभवास येत नाही कारण पैसे पाठविणे, पैसे काढणे इत्यादी सेवा सुलभ झाल्या आहे. तरी सुद्धा काही विशिष्ट कार्य करण्याकरिता प्रत्यक्षरित्या बँकेत जावे लागते त्यामुळे आपल्या राज्यातील प्रादेशिक सण उत्सव बघता बँकिंग सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रिझर्व्ह बँक वार्षिक कॅलेंडर घोषित करताना करत असते.

उद्योगविश्व : नोकरीपेक्षा स्वतंत्र व्यवसायिकतेकडे तरुणाईचा अधिक कल; कोरोना काळानंतर अर्थार्जनाचे पर्याय बदलले

सणासुदीच्या काळात बँकांसोबत शेअर बाजार देखील या महिन्यात तीन दिवसांकरिता बंद राहणार असल्याने ही बातमी शेअर गुंतवणूक करणाऱ्यांसाठी देखील महत्वाची ठरणार आहे. एकंदरीतच या महिन्यात बँकिंग सेवेचा लाभ घेताना ग्राहकांनी सुट्ट्याचे नियोजन बघता बँकेच्या शाखेचे कार्य आटोपणे हिताचे ठरेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.