Take a fresh look at your lifestyle.

अंदमान-निकोबारमध्ये धडकलं ‘हे’ चक्रीवादळ; ‘या’ ठिकाणी सुसाट वाऱ्यासह कोसळणार पाऊस

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – रविवारी आग्नेय बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. याच हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचं आता चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. 2022 चं ‘असनी’ नावाचं पहिलं चक्रीवादळ रविवारी अंदमान आणि निकोबार बेटांवर येऊन धडकलं आहे. यामुळे बंगाल उपसागरात आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण अंदमान समुद्रालगत तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र पूर्व आणि ईशान्येकडं सरकलं आहे असं भारतीय हवामान खात्याने म्हटलं आहे. दरम्यान, आज असनी चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रविवारी कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र झालं असून त्याचं चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. शिवाय, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. हे चक्रीवादळ रविवारी अंदमान बेटांवर धडकलं असून बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस कोसळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.