Take a fresh look at your lifestyle.

आशिष शेलार ‘या’ क्रीडा मंडळाच्या खजिनदार पदी नियुक्त; ९६२९ कोटी मालमत्ता खजिन्याची चावी सांभाळणार

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे मोठी आर्थिक जबाबदारी देण्यात आली असून ही बाब क्रीडा क्षेत्राशी निगडित आहे. याअगोदर आशिष शेलार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य, मुंबई फुटबॉल असोसिएशन चेअरमन पद, राजस्थान स्पोर्ट्स क्लब उपाध्यक्ष पद, मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपद इत्यादी क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचा पगार व निवृत्तीवेतन दिवाळीपूर्वीच, बोनस नाहीच!

नुकत्याच घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आशिष शेलार यांच्याकडे जगातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणारे क्रिकेट बोर्ड भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय चे नवीन खजिनदार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. एकूण ९६२९ कोटी इतकी मालमत्ता सध्या बीसीसीआयच्या खजिन्यात असून या खजिन्याची चावी आशिष शेलार यांच्याकडे राहणार आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; केंद्र सरकारकडून ६ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ

नुकतेच बीसीसीआयचे नवे अध्यक्ष निवडण्यात आले असून या पदी माजी भारतीय क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बीसीसीआय च्या अंतर्गत मोठे फेरबदल केले जात असून, आशिष शेलारांची झालेली निवड देखील याच प्रक्रियेचा एक भाग समजला जात आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.