Take a fresh look at your lifestyle.

टी-20 विश्वचषकापूर्वीच भारत-पाकिस्तान आमनेसामने, आशिया कपच्या तारखा जाहीर

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून आशिया चषकाबाबत सुरू असलेला गोंधळ अखेर आज (शनिवारी) संपला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने आगामी आशिया चषक श्रीलंकेत खेळवला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. इतकचं नाही तर, त्यांनी स्पर्धेच्या तारखा देखील जाहीर केल्या आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ते सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत या स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे यंदा टी-20 वर्ल्डकप स्पर्धा असल्याने आशिया कप सुद्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येईल. 2018 मध्ये शेवटी आशिया चषक आयोजित करण्यात आला होता. तेव्हा ही स्पर्धा एकदिवसीय सामन्यांची होती. भारताने 50 षटकांची स्पर्धा जिंकली होती.

हेही वाचा – एमआयएमची ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकारणार? जयंत पाटील स्पष्टच बोलले!

दरम्यान, आशिया कपच्या तारखा जाहीर झाल्यामुळे टी-20 वर्ल्ड कपआधीही भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे 2021 च्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची भारताला दोन वेळेस संधी मिळणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत.

भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाचे ढग, येत्या 3 तासात ‘या’ जिल्ह्यात बरसणार सरी!

पाच टीमचं स्थान निश्चित

श्रीलंकेत होणाऱ्या आशिया कपमध्ये 6 टीम खेळणार आहेत, यातल्या 5 टीम निश्चित झाल्या आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या टीम आधीच क्वालिफाय झाल्या आहेत. आता क्वालिफायर राऊंडमधून हाँगकाँग, कुवेत, सिंगापूर आणि युएई यांच्यातली एक टीम आशिया कपसाठी क्वालिफाय होईल.

हेही वाचा – “‘ते’ व्हिडीओ काढा अन्यथा…”, आता रशियाची थेट गुगलला धमकी!

Leave A Reply

Your email address will not be published.