Take a fresh look at your lifestyle.

जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांना टेलिस्कोपद्वारे तारांगण दर्शन

0

अशोक निमोणकर, ओटीटी न्यूज नेटवर्क

जामखेड : आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेमार्फत जि. प. प्राथमिक शाळा पाडळी व पवार वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना टेलिस्कोपद्वारे आकाशातील तारे विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. या उपक्रमाचा तालुक्यातील पाडळी गावातून प्रारंभ करण्यात आला असून तालुक्यातील सर्व शाळेत हा उपक्रम होणार आहे.

तालुक्यातील पाडळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी राष्ट्रपती व शास्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमांचे पूजन करून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी गटशिक्षणधिकारी कैलास खैरे, शिक्षण विस्तार अधिकारी दिगंबर पवार, कृषी विस्तार अधिकारी विठ्ठल भजनावळे, केंद्रप्रमुख संतोष राऊत, के डी एफच्या समन्वयक प्रिया कांबळे, पाडळी गावचे सरपंच बाळासाहेब खैरे, उपसरपंच प्रकाश पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण खैरे, बजरंग पवार, शिवाजी पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश खैरे, जालिंदर भोगल, मुख्याध्यापिका शोभा कांबळे, पाडळी शाळेतील शिक्षक, गावातील ग्रामस्थ व दोन्ही शाळेतील सुमारे १६५ विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी खैरे म्हणाले, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेमार्फत जामखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांना टेलीस्कोपद्वारे आकाश दर्शन व तारांगण दर्शनामुळे खगोलीय माहिती मिळण्यास मदत होणार आहे, याचा सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी टेलिस्कोपद्वारे आकाशदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.