Take a fresh look at your lifestyle.

ठाकरेंवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री अमित शहांच्या भेटीला; पुढची रणनीती ठरली!

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मणिपूर, त्रिपुरासह सुमारे 14 राज्यांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. या सभेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

महाराष्ट्र सदनात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी गेले. मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनातून थेट अमित शहा यांच्या घरी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शहा लवकरच मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचेही बोलले जात आहे.

शिंदे गट-शिवसेनेचा कलगीतुरा रंगणार; दसरा मेळाव्यावरून ‘महाभारत’ सुरु

ठाकरेंचा शहांवर निशाणा

स्वराज्य स्थापनेनंतर अनेक लोक स्वराज्यावर आले होते. त्या कुळातील सध्याचे शहा, देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले आणि म्हणाले की, शिवसेनेला जमीन दाखवा. त्यांना हे माहित नाही की येथे जमिनीवरून हे फक्त गवताची पाती नाहीत तर तलवारीची पाती आहेत. तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शाह यांच्यावर निशाणा साधला.

हिम्मत असेल तर एका महिन्यात मुंबई महानगरपालिका आणि राज्याच्या निवडणुका घेऊन दाखवा. कुस्ती आम्हालासुद्धा येते. आपल्याकडेही तीच परंपरा आहे. बघू कोण कोणाच्या पाठीवर माती लावतं ते. हिंमत असेल तर या समोर, असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी अमित शहांना दिलं आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.