Take a fresh look at your lifestyle.

औरंगाबाद : दोन समलिंगी मैत्रिणींमध्ये जडलं प्रेम, ब्रेकअपनंतर घडलं असं काही…

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

औरंगाबाद – दोन समलिंगी मैत्रिणींमध्ये प्रेम बहरले. दोघीही साधारण 20 ते 21 वर्ष वयाच्या. अनेक दिवसांपासून त्या रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होत्या. दोघींमध्ये आजवर अनेकदा समलैंगिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र काही महिन्यांनी त्यातील एकीला हे नातं नकोसं झालं. त्याबाबत तिने आपल्या पार्टनरला कल्पनाही दिली. मात्र दुसरी तरुणी हे नातं तोडायला तयार नव्हती.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

कालांतराने दोघींमधील वितुष्ट इतकं वाढलं की, नाते कायम राखण्यासाठी एकीने दुसरीला विशिष्ट छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली. आणि मग काय दुसरीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी दोघींचे कुटुंबासहित समुपदेशन करून एकमेकींविरोधात काहीच तक्रार नसल्याचे लिहून घेत त्यांना कुटुंबियांच्या हवाली केले.

हेही वाचा – बैलगाडा शर्यत जिंकली पण मृत्यूने मात्र हरवलं, ‘असा’ झाला बैलगाडा मालकाचा मृत्यू!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता आणि कल्पना (दोघींची नावे बदलली आहे) या दोन तरुणी लहानपणापासून मैत्रिणी आहेत. त्याचं शिक्षणही सोबत झालेलं आहे. लहानपणापासून मैत्रिणी असल्यामुळे दोघींचे कुटुंबिय सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतात. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना त्यांच्यात आणखीच जवळीक वाढली. काही दिवसांनंतर दोघींनाही एकमेकींचे आकर्षण निर्माण झाल्याने मागील पाच वर्षांपासून त्या रिलेशनशिपमध्ये सोबत राहत राहतात. दरम्यानच्या काळात त्यांच्यात अनेकदा समलैंगिक संबंधही प्रस्थापित झाले.

हेही वाचा – रेशन दुकानदारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

मात्र, अचानक त्यांच्या नात्यात दुरावा आला. त्यामुळे कल्पनाने कवितापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. तिने याबाबतची माहिती कविताला दिली. मात्र कविता प्रेमात एवढी वेडी झाली होती की, तिला हे मान्य नव्हतं. तिने कल्पनाला लग्न कर म्हणत गळ घातली. या गोष्टीकडे कल्पनाने दुर्लक्ष केलं. तरी सुद्धा कविताने लग्नाचा तगादाच लावला.

हेही वाचा – जिल्हा परिषदेच्या शाळेतच माजी उपसरपंच आणि शिक्षण समिती अध्यक्षामध्ये हाणामारी, पहा व्हिडिओ…

कविताच्या या पवित्र्यामुळे कल्पना तणावग्रस्त झाली. त्यातच कविताने तिला काही छायाचित्रे व्हायरल करण्याची, आत्महत्येची धमकी दिली. त्यामुळे कल्पनाचा संयम सुटला. अखेर तिने सोमवारी क्रांती चौक पोलीस ठाणे गाठत याबाबतची माहिती दामिनी पथकाला दिली.

त्यावर दामिनी पथकाच्या प्रमुख सुषमा पवार यांनी कल्पनाला धीर देत हे प्रकरण व्यवस्थित समजवून घेतलं. त्यानंतर त्यांनी कविताला आणि तिच्या कुटुंबियांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतलं. दोघी तरुणी आणि त्यांचे कुटुंबिय पोलीस ठाण्यात आल्यानंतर सुषमा पवार यांनी दोघींचंही समुपदेश केलं. दोघींतील वाद संपुष्टात आल्याचे जाणवल्यानंतर एकमेकींची एकमेकींविरोधात काहीएक तक्रार नसल्याचे लिहून घेत कुटुंबियांच्या हवाली केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.