Take a fresh look at your lifestyle.

दैनिक अजिंक्य भारतच्या ‘जनरल मॅनेजर’ पदी अविनाश कराळे यांची नियुक्ती

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

अहमदनगर – दैनिक अजिंक्य भारत च्या जनरल मॅनेजर पदी अविनाश कराळे यांची नियुक्ती करण्यात आली असून, दिनांक १ सप्टेंबर २०२२ पासून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. गेल्या 14 वर्षांपासून अविनाश कराळे यांनी दैनिक लोकमत, दैनिक दिव्य मराठी, दैनिक पुढारी, दैनिक पुण्यनगरी, दि इंडियन एक्सप्रेस आदी दैनिकांच्या माध्यमातून प्रिंट मीडिया मध्ये विविध पदांवर काम केलेले आहे.

केंद्रीय महिला कर्मचाऱ्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय; प्रसूती रजेसाठी नवे नियम लागू

व्यवसायवृद्धी, प्रशासन व व्यवस्थापनामध्ये ते निपुण असून आजवरच्या कारकिर्दीत अतिशय जबाबदारीने आणि काळजीने त्यांनी आपली कर्तव्ये पार पाडली आहे. उत्तम जनसंपर्क, मोठा अनुभव, सकारात्मक विचार आणि कष्टाळू वृत्ती या जोरावर कराळे हे ‘दैनिक अजिंक्य भारत’ ला यशाच्या शिखरावर घेऊन जातील यात शंका नाही, असा विश्वास सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि ऑन धिस टाईम मिडियाचे मुख्य संपादक संदीप थोरात यांनी व्यक्त केला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.