Take a fresh look at your lifestyle.

पाम तेलाबद्दल जनजागृतीला गती मिळणार; देशभरातील व्यापाऱ्यांची एकजूट

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय बाजारपेठ ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशभरात खाद्यतेलाचा विचार करता पाम तेलाच्या वापराबद्दल जनतेमधून नापसंती दर्शविण्यात येते किंवा या तेलाचा वापर खूप कमी केला जातो. यामागील प्रमुख कारण म्हणजे अनेक लोकांना या तेलाबद्दल गैरसमज असतात. या सर्व बाबींचा विचार करता पाम तेलाच्या वापराला अधिक प्रोत्साहन देणे तसेच जनतेतील गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने दक्षिण आशियातील ५ प्रमुख देशांनी एकत्र येत एशियन पाम ऑईल अलायन्सची स्थापना केली आहे. कृषी क्षेत्राशी निगडित असणाऱ्या सॉलिडॅरिडॅड नेटवर्कच्या पुढाकाराने या अलायन्सची स्थापना करण्यात आली आहे.

आता स्मार्टफोनपासून मिळणार लाखोंना जीवदान; कॅमेरा मोजणार रक्तातली ऑक्सिजन पातळी

या संघटनेच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश म्हणजे पाम तेलाबद्दल जनजागृती करते, या तेलाच्या वापराबाबत लोकांना प्रोत्साहित करणे, लोकांचे पाम तेलाबद्दलचे गैरसमज दूर करणे इत्यादी आहे. इथे सर्वात महत्वपूर्ण उद्देश हा देखील आहे की आजपर्यंत विविध व्यापारांना पाम तेलाबद्दल त्यांच्या समस्या मांडता येत नव्हत्या याशिवाय भेदभाव होणे किंवा संधी न मिळणे अशाही बाबी प्रकर्षाने जाणवत होत्या, आता अलायन्सच्या स्थापनेमुळे हा गुंता सुटणार आहे.

पाकिस्तान जिंदाबाद घोषणाबाजी प्रकरण : मुख्यमंत्री मोठी कारवाई करणार

अलायन्सच्या माध्यमातून भारतातील विविध पाम तेल व्यापारी एकजूट झाल्याने भविष्यातील व्यापाराकरिता त्यांना एक खंबीर मंच प्राप्त झाला जिथे ते समस्या मांडू शकतील शिवाय कुणासोबत भेदभाव होणार नाही. आशियातील काही देश या अलायन्सचा भाग असल्याने आयात तसेच निर्यात धोरण राबविताना देखील मदत मिळणार आहे. यामुळे भविष्यात पाम तेलाच्या व्यापाऱ्यांकरिता व्यापार करणे अधिक सोपे जाणार आहे. याशिवाय खाद्यान्न म्हणून वापर होणाऱ्या तेलाच्या व्यापाराला देखील बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.