Take a fresh look at your lifestyle.

या महिन्यात लॉन्च होणार स्पोर्टी लूक, शानदार फीचर्ससह Bajaj Pulsar N160; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – 2022 Bajaj Pulsar N160 सध्या बजाज ऑटो कंपनी जोरदार फॉर्म मध्ये आहे. बजाज ऑटो ही भारतीय वाहन उत्पादक कंपनी आहे. अलीकडेच कम्पॅनिने काही मह्त्वाचबी आकडेवारी शेअर केली. या आकडेवारीनुसार, मे २०२२ मध्ये कंपनीने २.७५ लाख टू-व्हीलर्सची विक्री नोंदवली आहे. विशेष म्हणजे या महिन्यात अपेक्षेइतकी विक्री झालेली नाही असंही कंपनीने म्हटलं आहे.

पाहा VIDEO – एका रात्रीत स्टार बनलेल्या शेन वॉर्ननं टाकलेला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ पाहिलात का?

परिणामी, येत्या काळात बजाज ऑटो कंपनी आणखी काही मॉडेल्स लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. बजाजची न्यू जनरेशन बजाज पल्सर एन १६० (New Gen Bajaj Pulsar N160) ही बाइक नुकतीच टेस्टिंगदरम्यान पाहायला मिळाली. बजाजची ही नवीन बाइक पल्सर २५० च्या प्लॅटफॉर्मवर तयार होत असलेल्या नवीन पल्सर रेंजचा एक भाग असेल.

मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत पत्नीच्या नावे उघडा अकाउंट; छोट्याशा गुंतवणुकीवर मिळेल आयुष्यभर पेन्शन

नवीन 160N या बाइकमध्ये अनेक मोठे बदल अपेक्षित आहेत. ही बाइक नवीन डिझाइन व्यतिरिक्त अपडेटेड इंजिनसह लॉन्च केली जाऊ शकते. कंपनी सध्या ऑल न्यू नेक्स्ट जनरेशन पल्सर रेंजवर काम करत आहे. या रेंजमध्ये काही नवीन बाइक लवकरच बाजारात दाखल होतील. नवीन पल्सर N160 कंपनीच्या लाइन-अपमध्ये NS160 या बाइकला रिप्लेस करू शकते.

कुटुंबातील सर्वांचं आधार कार्ड प्रोफाईल एकाच ठिकाणी करा सेव्ह; चेक करा संपूर्ण प्रोसेस

नवीन डिझाईन मिळणार

नवीन बाइक ही सध्याच्या N250 सारखीच दिसते. याचं बॉडी पॅनेल, हेडलॅम्प काउल आणि टेल सेक्शन N250 सारखंच आहे. नवीन बाइकच्या हेडलॅम्पला प्रोजेक्टर लेन्स आणि एलईडी डीआरएल देण्यात आले आहेत. ही बाइक तरूण ग्राहकांना नजरेसमोर ठेवून डिझाईन करण्यात आली आहे. त्यामुळेच यात स्प्लिट सीट, एलईडी टेललाइट आणि स्पोर्टी रायडिंग पोस्चर देण्यात आलं आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

नवीन इंजिन मिळणार

नवीन Pulsar N160 या बाइकमध्ये १७ इंचांचे अलॉय व्हील्स दिले जातील, जे MRF टायर्ससह येतात. या बाइकच्या किंमतीत फरक केला जाणार नाही असं म्हटलं जात आहे. म्हणजेच जुन्या बाइकच्या किंमतीतच नवीन बाइक लाँच केली जाऊ शकते. या बाइकच्या मॉडेलचची दिल्लीतली सध्याची एक्स शोरुम किंमत १.२२ लाख रुपये इतकी आहे.

ही बाइक यंदाच्या दिवाळीच्या आसपास लाँच केली जाऊ शकते. बाजारात दाखल झाल्यानंतर या बाइकची टीव्हीएस आपाचे आरटीआर १६० ४व्ही (TVS Apache RTR 160 4V), यामाहा एफझेड-एस एफआय(Yamaha FZ-S FI), हिरो एक्स्ट्रीम १६० आर (Hero Xtreme 160R) आणि सुझुकी जिक्सर (Suzuki Gixxer) या गाड्यांसोबत स्पर्धा असेल.

Comments are closed.