Take a fresh look at your lifestyle.

या बँकांमध्ये आजपर्यंतचे सर्वाधिक फ्रॉड्स; बघा तुमचंही खातं इथे आहे का?

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – देशात बँक फ्रॉड होण्याकज प्रकार काही नवीन नाहीत. आतापर्यंत बँकिंग क्षेत्रात फ्रॉडच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बँकांच्या कामकाजाविषयी हेराफेरी करणे तसेच ऑनलाईन फ्रॉड होणे, किंवा विविध कर्जांच्या नावाखाली बँकेची आणि बँक अधिकाऱ्यांची फसवणूक करणे अशा अनेक घटना उघडकीस येत असतात. या फसवणुकीसंदर्भात काही माहिती भारत सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

या माहितीतील आकडेवारीनुसार, बँकिंग क्षेत्रातील फ्रॉडमध्ये कोटक महिंद्रा बँक देशभरात सर्वात पहिल्या नंबरवर आहे. यंदा 2021-22 च्या सुरुवातीच्या नऊ महिन्यातच कोटक महिंद्रा बँकेत बँक फसवणुकीच्या 642 घटना समोर आल्या आहेत. ज्यात 1 लाख किंवा त्याहून अधिक रकमेची फसवणूक झालेली आहे. बँक फसवणुकीच्या आकडेवारीत कोटक महिंद्रा बँकेनंतर आयसीआयसीआय बँक दुसऱ्या क्रमांकावर तर इंटसइंड बँक तिसऱ्या क्रमांकावर आहे.

लग्नाचं अमिष दाखवून ज्ञानेश्वरचा झाला मोहम्मद; पण ६ दिवसातच भयंकर प्रकार उघडकीस

अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सोमवारी संसदेत ही माहिती दिली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारने सांगितलं, की केवळ कोटक महिंद्रा बँकमध्ये फ्रॉड झाला नाही, तर अनेक लहान-मोठ्या बँकांमध्येही बँकिंगसंबंधी हेराफेरी झाली आहे.

त्याशिवाय भागवत कराड यांनी कोटक महिंद्रा बँकेत मागील काही वर्षात झालेल्या फ्रॉडची माहिती दिली. RBI च्या आकडेवारीनुसार, 2017 मध्ये 135 फ्रॉड, 2018 मध्ये 289, 2019 मध्ये 383 आणि 2020 मध्ये 652 फ्रॉडची प्रकरणं समोर आली. तर 2021 मध्ये बँकिंग फ्रॉडच्या घटना 826 पर्यंत पोहोचल्या. आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये पहिल्या 9 महिन्यात फ्रॉडची संख्या 642 पर्यंत पोहोचली.

भारतासमोर रशियाने ठेवला मोठा प्रस्ताव! कच्च्या तेलाचा हा प्रस्ताव भारत स्वीकारेल का?

Leave A Reply

Your email address will not be published.