Take a fresh look at your lifestyle.

बावनकुळे बारामतीचं ‘घड्याळ’ बंद पाडणार; भाजपचा पुढचा अजेंडा काय?

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

पुणे : बारामतीत राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडू, असा ओपन चॅलेंज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. बारामतीत घड्याळ बंदच पडणार, असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. बारामतीपाठोपाठ खेड आळंदीही आमचे टार्गेट असल्याचेही बावनकुळे यांनी आधी स्पष्टच केलं आहे.

शिवसेनेपाठोपाठ आता भाजप राष्ट्रवादीला फोडण्याचा डाव रचत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. मात्र फोडा-तोडाची वृत्ती राष्ट्रवादीची आहे, असा पलटवार बावनकुळे यांनी केला. खेडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बावनकुळे बोलत होते.

उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द संजय देशमुखांनी पाडला; पक्षप्रमुखांनी केली महत्त्वाची घोषणा

चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसने आजपर्यत याला फोड, त्याला मार तोड हीच वृत्ती अवलंबली. आयुष्यभर पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहिले, मात्र कधी बनू शकले नाहीत. पुढे भविष्य माहीत नाही, असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर बावनकुळे यांनी निशाणा साधला.

पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आहे. या सत्तेकडे भाजपने आता लक्ष घातले आहे. त्यामुळे भविष्यात भाजपचा थेट सामना राष्ट्रवादी काँग्रेसशीच होणार असल्याचं दिसत आहे. पुण्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात भाजपने पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन राष्ट्रवादीला अस्वस्थ केले.

काँग्रेसच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात निवेदन सादर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कात्रज दूध संघाचे माजी संचालक शेखर शेटे, खेड पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना गवारी, माजी आमदार नारायण पवार यांच्या कन्या प्रिया पवार यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आजचा आवाज सिल्व्हर ओकपर्यंत जाईल, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.