Take a fresh look at your lifestyle.

आरटीओ निरीक्षकाला मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल

0

अनिल पांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील आरटीओ कार्यालय (उपप्रादेशिक परिवहन कार्यालय) येथे काल दुपारी ४.४५ च्या सुमारास मोटर वाहन निरीक्षक विकास लक्ष्मण सूर्यवंशी यांना मारहाण करून धमकी देण्याचा प्रकार घडला. या घटनेने आरटीओ कार्यालय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जखमी मोटार वाहन निरीक्षक सूर्यवंशी (वय ४५, नेमणूक उपप्रादेशिक कार्यालय, श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर शहर पोलीसांत फिर्याद दिल्यावरून गणेश विकास आमले, विजय देविदास जाधव ( दोघे रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर) यांच्याविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

निरीक्षक सूर्यवंशी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरणाचे कामकाज, ब्रेक टेस्ट, ट्रॅकवर वाहन तपासणी करत असताना त्याठिकाणी गणेश आमले व विजय जाधव हे दोघे अचानक समोर आले. त्यांनी त्यांच्याजवळील टाटा झिप चारचाकी वाहन घेवून येवून आमच्या गाडीचे योग्यता प्रमाणपत्र काढून द्या. तेव्हा निरीक्षक सूर्यवंशी म्हणाले की, तुम्हाला योग्यता प्रमाणपत्र काढण्यासाठी कार्यालयीन पद्धतीने वेळ घेवून दिलेल्या वेळेत यावे लागेल. तुम्ही तुमची गाडी ब्रेक टेस्ट ट्रॅकवरून बाजूला घ्या. याचा राग आल्याने आरोपींनी मारहाण करत धमकी देवून गाडीची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र द्या नाहीतर येथेच आमची गाडी डिझेल टाकून पेटवून देवू अशी धमकी दिली. या गुन्ह्याचा तपास पो. नि. सानप पुढील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.