Take a fresh look at your lifestyle.

आधार कार्ड हरवलं तरी टेन्शन नाही, मोबाईलमध्ये लगेच डाउनलोड करा mAadhaar app; मिळणार अनेक फायदे

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – सध्या आधार कार्ड (Aadhar Card) तसेच Pan Card हे सध्या सर्वात महत्त्वाचे दस्तावेज आहेत. शैक्षणिक काम, मालमत्ता खरेदी करण्यापासून ते शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापर्यंत, आर्थिक व्यवहार, कार्यालयीन कामकाज या सर्वांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड (Pan Card) हे अतिशय महत्वाचे दस्तावेज आहेत.

OnePlus Offers:आता बजेटची चिंता सोडा, केवळ अर्ध्या किमतीत खरेदी करा OnePlus चा ‘हा’ पॉवरफुल 5G स्मार्टफोन

2009 मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने आधार कार्ड योजना सुरू केली होती. प्रत्येक व्यक्तीची बायोमेट्रिक माहिती असल्यामुळे आधार कार्ड हे इतर कागदपत्रांपेक्षा वेगळे आहे. बायोमेट्रिक पद्धतीने त्यात आपली माहिती नोंदवली जाते. हातांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे रेटिना स्कॅन यांच्या आधारे आधार कार्ड बनवले जातात.

आधार कार्ड Adhar कार्ड चा वापर सध्या कमालीचा वापरला आहे. सातत्याने होत असलेल्या आधार कार्डच्या वाढत्या वापरामुळे आधार कार्ड हरवल्यास दैनंदिन जीवनात मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. आधार कार्ड हरवल्यानंतर पुढे काय करायचे याविषयी कुठलीही माहिती नसल्यामुळे अनेकदा नागरिक गोंधळात पडतात. मात्र, UIDAI ने एक अँप्लिकेशन mAadhaar App हे लॉन्च केले आहे. या ऍपद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्ड सहज सेव्ह करू शकता. mAadhaar हे ऍप्लिकेशन कसे वापरायचे तसेच या ऍपचे फायदे काय आहेत याविषयी माहिती घेऊया. माहिती घेऊयात.

डिझेल खर्चातून शेतकऱ्यांची होणार सुटका; या सरकारी योजनेतून मिळणार 75% अनुदान

mAadhaar एप्लिकेशन वापरण्याचे फायदे –

मोबाईलमध्ये mAadhaar ऍप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही आधारमध्ये टाकलेला पत्ता सहज बदलू शकता. याशिवाय सुरक्षेसाठी या ऍपला तुम्ही तुमचे बायोमेट्रिक लॉक ठेवू शकता. याच्या मदतीने तुम्ही या अॅपद्वारे तुमची केवायसी प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करू शकता. या अॅपमध्ये आधार सेव्ह करून तुम्ही ऑफलाइन मोडमध्येही ही सेवा वापरू शकता.

बापरे! रातोरात झाला कोट्याधीश! खात्यात अचानक आले तब्बल 25 कोटी रुपये, पण…

अशी तयार करा mAadhaar वर आपली प्रोफाइल

1. mAadhaar अप्लिकेशनवर प्रोफाइल तयार करण्यासाठी, प्रथम तुम्ही नोंदणी आधार पर्यायावर क्लिक करा.

2. यानंतर तुम्ही 4 अंकी पासवर्ड तयार करा.

3. तुम्हाला आधार तपशील विचारला जाईल, तो भरा.

4. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. ते एंटर करा.

5. तुमचा आधार क्रमांक mAadhaar अॅपमध्ये नोंदणीकृत होईल.

6. मेनूमधील My Aadhaar टॅबवर क्लिक करा.

7. येथे 4 क्रमांकाचा पिन एंटर करा.

8. तुमच्या समोर आधारकार्ड ओपन होईल.

आता खासगी नोकरी करत असाल तरीही मिळेल पेन्शन; ‘या’ सरकारी योजनेचा घ्या फायदा

Comments are closed.