Take a fresh look at your lifestyle.

महागाईचा भडका! Alto नंतर आता WagonR च्या किंमतीतही वाढ, जाणून घ्या नव्या किंमती

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – Maruti Suzuki WagonR Price April 2022: मारुती सुझुकीने नुकतीच आपल्या वेगनआर WagonR च्या फेसलिफ्ट मॉडलला लाँच केले होते. कंपनीने यात नवीन व्हेरियंट्स आणि कलर ऑप्शनचा समावेश केला होता. याशिवाय, आधीच्या तुलनेत याचे मायलेज वाढवले होते. परंतु, तुम्ही या कारला खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी एक बॅड न्यूज आहे.

Alert! महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस! वादळ आणि सोसाट्याचा वाराही हजेरी लावणार

मारुती सुझुकीने आपल्या नवीन वेगनआरच्या किंमतीत वाढ केली आहे. मारुतीने आपली वेगनआरच्या किंमतीत ५ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. याशिवाय, कंपनीने वेगनआरच्या २ व्हेरियंट्सची विक्री बंद केली आहे. आधी वेगनआरची सुरुवातीची किंमत ५.४० लाख रुपये होती. परंतु, आता बेस व्हेरियंट Tour H3 Petrol ला हटवणे आणि मोठ्या किंमती वाढीनंतर याची सुरुवातीची दिल्ली एक्स शोरूम किंमत ५.४८ लाख रुपये झाली आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी Maruti Suzuki WagonR च्या सर्व व्हेरियंट्सची नवीन किंमत आणि जुन्या किंमतीसंबंधी माहिती देत आहोत.

क्रिकेट विश्वात खळबळ! IPL सुरु असतानाच ‘या’ दिग्गज खेळाडूचा धक्कादायक निर्णय; महत्वाचं कारण समोर

हे व्हेरियंट झाले बंद


वाढलेल्या किंमती आधी मारुती आपली नवीन वेगनआरच्या ११ व्हेरियंट्सची विक्री करीत होती. यात Tour H3 Petrol, LXI 1.0, VXI 1.0, ZXI 1.2, Tour H3 CNG, VXI AGS 1.0, LXI CNG, ZXI+ 1.2, ZXI AGS 1.2, VXI CNG 1.0 आणि ZXI+ AGS 1.2 चा समावेश होता. परंतु, आता कंपनी याच्या ९ व्हेरियंट्सची विक्री करीत आहे. म्हणजेच कंपनीने आपल्या वेबसाइट वरून Tour H3 Petrol आणि Tour H3 CNG ला हटवले आहे.

अप्लाय करुन देखील PAN Card आलं नाहीय का? असं चेक करा स्टेटस

केवळ एकाच व्हेरियंटमध्ये मिळेल CNGचा ऑप्शन


वाढलेल्या किंमती आधी मारुती सुझुकी तीन व्हेरियंट्समध्ये ऑल्टोच्या सीएनजी कारची विक्री करीत होती. परंतु, आता वेबसाइटवरून Tour H3 CNG ला हटवले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता LXI CNG आणि VXI CNG 1.0 व्हेरियंट मध्ये सीएनजीचा ऑप्शन मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.