Take a fresh look at your lifestyle.

Ola E-Scooter ला टक्कर देणाऱ्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच ; सिंगल चार्जमध्ये ११५ किमी रेंज, अवघ्या ४९९ रुपयांत करा बुकिंग

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – Ola E-Scooter सध्या गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर सातत्याने वाढताना दिसत असल्याचं चित्र आहे. देशात महागाईचा आगडोंब उसळला असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, पर्यावरण पूरक असल्याने तसेच पेट्रोल डिझेल सारख्या इंधनाला अतिशय कमी किमतीतील पर्याय म्हणून इलेक्ट्रिक गाड्यांकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. वर्षभरापूर्वी इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये ठराविक पर्याय होते. तेव्हा ग्राहकांना त्यापैकी एक स्कूटर निवडणं खूप सोपं होतं.

तुमचा CIBIL Score कमी असला तरी घेता येईल पर्सनल लोन, फक्त ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

किंमत, ड्रायव्हिंग रेंज आणि चार्जिंग ऑप्शन्स पाहून ग्राहक त्याच्यासाठी योग्य ती इलेक्ट्रिक स्कूटर निवडत होते. मात्र आता देशात इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे. त्यातही प्रामुख्याने इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेगमेंटमध्ये मोठी उलथापालथ सुरू आहे. अनेक वाहन कंपन्या आपापल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच करत आहेत.

या कंपन्यांना आता मोठी स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळे त्यांना कमी कमी किंमतीत चांगली ड्रायव्हिंग रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर देणं भाग पडलं आहे. अशातच आज एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल झाली आहे. BGAUSS या कंपनीने आज त्यांची तिसरी इलेक्ट्रिक स्कूटर, बीजी डी १५ (BG D15) लाँच केली आहे. ही स्कूटर दोन व्हेरिएंट्समध्ये येते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

डी १५ (D15) ही प्रीमियम पण किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर आहे. विशेष म्हणजे बीजी डी १५ पूर्णपणे वॉटरप्रूफ, IP ६७ रेटेड इलेक्ट्रिक मोटरसह सुसज्ज आहे. ही बॅटरी उष्णतेतही सुरक्षित राहील असा कंपनीचा दावा आहे. ही बॅटरी डस्टप्रूफदेखील आहे. बीजी डी १५ ही स्कूटर दोन व्हेरिएंट्समध्ये येते. यात D15i आणि D15 Pro चा समावेश आहे.

सिंगल चार्जवर ११५ किमी रेंज

कंपनीने दावा केला आहे की, बीजी डी १५ या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ३.२ केडब्ल्यूएच लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही स्कूटर स्पोर्ट्स मोडमध्ये केवळ ७ सेकंदात ० ते ६० किमी प्रतितास इतक्या वेगाने धावते. यात इको मोडदेखील देण्यात आला आहे. या स्कूटरला १६ इंचांचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. स्कूटरमधली बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी ५.३० तास लागतात. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ११५ किलोमीटरपर्यंतची रेंज देते.

राज्यसभेतील सहावी जागा कोणाची? मविआत रस्सीखेच; आता लक्ष शरद पवारांच्या भूमिकेकडे

शानदार फीचर्स

कंपनीने या स्कूटरमध्ये अनेक चांगले फीचर्स दिले आहेत. ही स्कूटर अॅपद्वारे स्मार्टफोनशी कनेक्ट करता येईल. यात रिमूव्हेबल बॅटरी, इन-बिल्ट नेव्हिगेशन, डिजिटल स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कीलेस स्टार्ट, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट, कॉल आणि नोटिफिकेशन अलर्ट यांसारखे लेटेस्ट फीचर्स देण्यात आले आहेत.

किंमत आणि बुकिंग रक्कम

BGAUSS कंपनीचे भारतात १०० शोरूम आहेत. ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवरून लेटेस्ट BG D15 स्कूटर अवघ्या ४९९ रुपयांमध्ये बुक करु शकतात. या स्कूटरचं बेस व्हेरिएंट D15i हे ९९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल, तर D15 Pro साठी तुम्हाला १,१४,९९९ रुपये मोजावे लागतील.

IPL 2022 बटलर-परागची हुशारी पाहिलीत का? चक्क SIX चे केलेय OUT मध्ये रूपांतर

Comments are closed.