Take a fresh look at your lifestyle.

गुड न्यूज! नागपुरातून निघणार ‘भारत दर्शन यात्रा’ ‘या’ धार्मिक स्थळांचे होईल दर्शन

0

 

ऑन धिस टाइम नेटवर्क

नागपूर : तुम्ही जर भारत दर्शन करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने यात्रेकरूंसाठी एक स्पेशल ट्रेन सुरू केली आहे. पिलग्रिम स्पेशल टुरिस्ट ट्रेन असं या ट्रेनचं नाव आहे. ही ट्रेन फक्त भारतातील प्रेक्षणीय तसेच धार्मिक स्थळांसाठी चालवली जाते.

या धार्मिक स्थळांचे होईल दर्शन

या ट्रेनमार्फत तुम्हाला भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांचे दर्शन घेता येणार आहे. यामध्ये पुरीतील जगन्नाथ मंदिर, कोणार्क मंदिर, भुवनेश्वरमधील लिंगराज मंदिर, कोलगिरी स्तूप खंडगिरी, कोलकाता येथील कालीघाट आणि बिर्ला मंदिर, गुवाहाटीमधील कामाख्या मंदिर आणि बालाजी मंदिर, गया येथील विष्णुपद मंदिर आणि बोध गावातील महाबोधी मंदिर इत्यादी स्थळांचा समावेश आहे.

भारत दर्शन

येथून करता येईल प्रवास

सदरील ट्रेन इतवारी रेल्वे स्टेशन (नागपूर) येथून 23 मार्च 2022 रोजी सुटेल. प्रवाशांच्या बोर्डिंग सुविधेसाठी गोंदिया आणि भंडारा रोड रेल्वे स्थानकेही निश्चित करण्यात आली असून, त्यासाठी पॅकेज बुकिंगही सुरू झाले आहे. या प्रवासी पॅकेजमध्ये, स्लीपर क्लासच्या प्रवाशांसाठी धर्मशाळा/डॉर्मेटरी मध्ये नाश्ता व रात्रीच्या मुक्कामाची सुविधा आहे. तसेच एसी क्लासच्या प्रवाशांसाठी नॉन एसी हॉटेल्समध्ये नाश्ता किंवा रात्रीचा मुक्काम मिळेल.

शुद्ध शाकाहारी जेवण

प्रवासादरम्यान प्रवाशांना, नॉन एसी बसमधून प्रेक्षणीय स्थळे देखील पाहता येईल.
विशेष बाब म्हणजे प्रवाशांना प्रवास विम्याची सेवा देखील देण्यात येणार आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता भारत सरकारच्या नियम व सूचनांचे पालन करून ही यात्रा काढण्यात येत आहे.

तिकीटाचे दर किती?

दरम्यान, या 9 दिवसांच्या प्रवासासाठी स्लीपर क्लासचे तिकीट प्रति व्यक्ती रुपये 8505/- आणि एसी क्लाससाठी 14175/- रुपयांचे तिकीट ठरवण्यात आले आहेत. यात्रेकरूंनी अधिक माहितीसाठी, IRCTC हेल्पलाइन क्रमांक 8287932242 वर संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.