Take a fresh look at your lifestyle.

भरत गोगावले म्हणाले, “वो क्या हमको धक्काबुक्की करेंगे हमने उनको धक्काबुक्की किया”

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले असताना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी हिंदीत प्रतिक्रिया दिल्याची विधानभवनात चर्चाच रंगली. विरोधी आमदारांना धक्काबुक्की केल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता गोगावले म्हणाले की, ”अरे हाड वो क्या हमको धक्काबुक्की करेंगे हमने उनको धक्काबुक्की किया” असे सांगताच सभागृहात हशा पिकला.

राज्यात सात हजार पोलिसांची भरती होणार! फडणवीसांची अधिवेशनात माहिती

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली, त्याचे रूपांतर शाब्दिक चकमकीत झाले. यानंतर भरत गोगावले यांनी या प्रसंगाबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिली. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही तुम्ही आमच्या अंगावर येऊ नका. आमचा नाद करायचा नाही, असा इशारा भरत गोगावले यांनी विरोधी आमदारांना दिला.

“तर मी राजीनामा देईल! “दीपक केसरकरांची सिंहगर्जना; विरोधकांना दिले प्रत्युत्तर

भरत गोगावले यांनी मराठीत प्रतिक्रिया दिल्यानंतर हिंदी वाहिन्यांच्या पत्रकारांनी गोगावले यांना हिंदीमधून प्रतिक्रिया देण्याचा आग्रह केला. त्यावर ‘ये तो अभी ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’ असा इशारा गोगावले यांनी दिला. विरोधी आमदारांनी सत्ताधारी आमदारांना धक्काबुक्की केली का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता “अरे हाड वो क्या हमको धक्काबुक्की करेंगे हमने उनको धक्काबुक्की किया” अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.