Take a fresh look at your lifestyle.

उद्धव ठाकरेंच्या ‘बाई’ शब्दोच्चारावर भावना गवळींचे प्रत्युत्तर; व्यक्त केले दुःख

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी या शिवसेनेच्या मातब्बर नेत्या म्हणून ओळखल्या जातात. अनेक वर्षांपासून गवळी यांनी वाशीम-यवतमाळ मतदारसंघात सेनेचा गड राखला आहे. सध्या राज्यात एकनाथ शिंदे भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आल्याने अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला होता, त्यापैकी खासदार भावना गवळी या देखील एक आहेत. नुकताच शिवसेनेच्या गटनेत्यांचा मेळावा मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौफेर टीका करत केंद्रीय नेतृत्व व एकनाथ शिंदे तसेच भाजपवर शरसंधान केले होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी खासदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधल्याचा प्रसंगाचा उल्लेख करत टीका करताना म्हटले होते की, ज्या बाईवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत नेमकी तीच बाई पंतप्रधान नरेंद्र मोदींना करोडो जनतेतून राखी बांधायला मिळाली मला याचे आश्चर्य वाटते.

केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा; चंद्रपुरात मोठ्या क्षमतेची पेट्रोलियम रिफायनरी स्थापन करणार

आता उद्धव ठाकरे यांच्या टीकेला खासदार भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिले असून, त्या म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी अनेक वर्षांपासून राखी बांधत आहे, ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा देखील मी गुजरातला जाऊन त्यांना राखी बांधायची त्यामुळे हे सर्व नवीन नाही आहे. परंतु ज्या प्रकारे उद्धव ठाकरे साहेबांनी माझा उल्लेख बाई म्हणून केला हे दुःखदायक आहे. ज्यांच्याकरिता मी कालपर्यंत ताई होते आज त्यांच्या करिता मी बाई झाले, या गोष्टीची खंत व दुःख वाटते.

‘आरबीआय’चे कठोर धोरण; राज्यातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द

पुढे बोलताना खासदार गवळी म्हणाल्या की, राजकारण करायचे झाल्यास इतर मुद्दे सोडून राखी सारख्या पवित्र बंधनावर राजकारण होत आहे. कठीण परिस्थितीत मला एकनाथ शिंदे साहेबांनी साथ दिली म्हणून मी आज त्यांच्या बरोबर आहे. परंतु उद्धव साहेबानी माझा बाई म्हणून उल्लेख केल्याने मी दुखावली असल्याचे मत भावना गवळी यांनी व्यक्त केले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.