Take a fresh look at your lifestyle.

Bhendwal Bhavishyavani : देशावर अर्थिक संकट! राजा कायम राहणार? पीक ते पाऊसपाणी, भेंडवळची भविष्यवाणी काय सांगते?

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

बुलढाणा – दरवर्षीप्रमाणेच यंदाही भेंडवलीचा कार्यक्रम आज उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे या भेंडवळीच्या भविष्यवाणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. या भविष्यवाणीमध्ये पीकपाणी, पाऊस, रोगराई, सत्तापालट अशा अनेक विषयांवर भाकित वर्तवली जातात. बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ
येथे सुमारे 350 वर्षांपासून ही परंपरा जोपासली जाते. या भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते.

Free LPG Gas Cylinder – Paytm वापरा आणि फ्री मिळवा गॅस सिलेंडर, बुक करण्याची सोपी प्रोसेस पाहा

भेंडवळची भविष्यवाणी म्हणजे काय?

बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ गावात अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भविष्यवाणी वर्तवली जाते. म्हणून याला भेंडवळची भविष्यवाणी म्हणतात. हे भाकीत घट मांडणी करुन वर्तवली जातात. अक्षय्य तृतीयेला घटाची मांडणी होते. घट मांडणीचा मान वाघ घराण्याकडे आहे. ही परंपरा वाघ घराण्यातील चंद्रभान महाराज वाघ यांनी सुरु केली होती. अक्षय्य तृतीयेला सुर्यास्तापूर्वी वाघ घराण्याचे वंशज गावाबाहेर शेतात घटची मांडणी करतात.

🔥अखेर मनसुख हिरेन यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधाराचे नाव समोर! एनआयएनचा मोठा खुलासा

भविष्यवाणीसाठी घट मांडणी होते कशी?

घटामध्ये 18 धान्य असतात. यात गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा हे धान्य गोलाकार पद्धतीने मांडले जातात. घटाच्या मध्यभागी खोल खड्डा करुन पावसाळ्याच्या चार महिन्याचे प्रतिक असलेली चार मातीची ढेकळे त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवतात. घागरीवर पापड, भजी, वडा, सांडोळी, कुरडई, विड्याच्या पानावर सुपारी ठेवून प्रतिकात्मक मांडणी केली जाते. दुसऱ्या दिवशी या घटात झालेल्या बदलावरुन भाकीत वर्तवलं जातं.

😀17 हजारांचा फोन खरेदी करा केवळ 749 रुपयांमध्ये, Redmi च्या 5G फोनवर जबरदस्त ऑफर

यंदाची भेंडवळ काय सांगते?

यंदा पाऊस कसा असेल?

१. जून, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात यंदा चांगला पाऊस पडणार.

२. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडणार

पिकांसंदर्भात भविष्यवाणी काय सांगते?

१. देशात पीक चांगलं येईल.

२. ज्वारी, कापूस, उडीद, हरभरा पिकं चांगली येतील या पिकांना भाव मिळेल.

३. वटाणा, बाजरी, गहू ही पिके मध्यम स्वरुपात येतील.

🔥ब्रेकिंग! रिझर्व्ह बॅंकेचा सर्वसामान्यांना मोठा धक्का; सर्वच कर्ज महागणार

राजकीय भाकीत

१. सत्तापालट होणार नाही.

२. राजा कायम राहणार.

३. देश अर्थिक अडचणीत असेल

आरोग्य विषयक

मागचे काही दोन ते तीन वर्ष देशावर कोरोनाचं सावट आहे. मात्र, यंदाचं भाकीत समाधानकारक आहे. रोगराईचा नायनाट होईल असं भाकीत भेंडवळमध्ये वर्तवण्यात आलंय.

VIDEO -बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत राज ठाकरे यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं

Leave A Reply

Your email address will not be published.