Take a fresh look at your lifestyle.

राजकारणातील सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव ठरलं

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई -गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात नाटकीय घडामोडी घडताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेतून बंड केलं आहे. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. आता एकनाथ शिंदे नेमका पुढे काय निर्णय घेणार? उद्धव ठाकरे यांचं पुढचं पाऊल काय असेल असे प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडले आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाला अधिकृत नाव दिलं असल्याची माहिती समोर आली आहे.

मातोश्री’त सत्ताकेंद्र, शरद पवार-ठाकरेंमध्ये तब्बल दोन तास खलबतं, आज घेणार मोठा निर्णय?

महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनतेविरोधात (Shivsena) बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या गटाला अधिकृत नाव दिल्याची माहिती आहे. ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट’ असं या गटाचं नामकरण करण्यात आलं आहे.

एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; आता रोख पैसे नसले तरीही ‘असं’ मिळणार तिकीट

“शिवसेना बाळासाहेब असं गटाचं नाव ठेवलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आमची बांधिलकी कायम आहे. आम्ही स्वतंत्र गट स्थापन केला आहे. आम्ही कुणामध्येही विलीन होणार नाही. गटाचं अस्तित्व स्वतंत्र असणार आहे. कुणीही पक्षातून बाहेर पडलेलं नाही. विधिमंडळात मात्र आमची भूमिका वेगळी असणार आहे.” असं बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्याने महाराष्ट्रातील शिवसैनिक आणखीच आक्रमक झाले आहे. जाणिवपूर्वक आपल्या गटाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देवून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील जनतेला भावनिक करत आहे. असं शिवसैनिकांनी म्हटलं आहे. शिवसेनेतून बंड करून कुणी शिवसैनिक होतो का? असा प्रश्नही शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.

‘मातोश्री’त सत्ताकेंद्र, शरद पवार-ठाकरेंमध्ये तब्बल दोन तास खलबतं, आज घेणार मोठा निर्णय?

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव ‘शिवसेना बाळासाहेब’ असं ठेवण्यात आलं आहे. या नावामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे या नावावर शिवसेनेकडून कायदेशीर आक्षेप घेतला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या नावाची लवकरच एकनाथ शिंदे गटाकडून घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Comments are closed.