Take a fresh look at your lifestyle.

SSC Result 2022 : Big Breaking उद्या ‘या’ वेळेत दहावीचा निकाल जाहीर होणार; ‘या’ लिंकवर पाहता येणार निकाल

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – SSC Result 2022 नुकताच राज्यभरातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला. त्यापाठोपाठ आता राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर (Maharashtra SSC board exam 2022 result date announced) करण्यात आली आहे. उद्या म्हणजेच 17 जून रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ट्विट करून दिली.

Hero Splendor Offer : हिरो स्प्लेंडर प्लस खरेदी करा फक्त २५ हजार रुपयांत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. 17 जून, 2022 रोजी दु. 1 वा.ऑनलाईन जाहीर होईल असं ट्विट शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. यंदा कोरोनाच्या पार्शवभूमीवर शिक्षण ऑनलाईन झाले, मात्र परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. त्यामुळे निकालाबाबत सर्वानाच उत्सुकता आहे.

5G Spectrum : आताची सर्वात मोठी बातमी! लवकरच तुमच्या दारी 5 जी सेवा… स्पेक्ट्रम लिलावाला केंद्राची मंजुरी!

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी 1 नंतर उपलब्ध होतील.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.