Take a fresh look at your lifestyle.

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; १८१ भूखंडाच्या वाटपाचा मार्ग मोकळा

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) केलेल्या भूखंड वाटपावरील स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली आहे. उद्योग विभागाने छाननी केल्यानंतर 181 भूखंड वाटपावरील स्थगिती उठवण्यात आली. दरम्यान, अद्याप १० प्रकल्पांची छाननी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 1.54 लाख कोटींचा वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने सरकार चांगलेच तापले आहे. त्यानंतर लगेचच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

संजय राऊतच मास्टरमाईंड : पत्राचाळ घोटाळा

मुख्यमंत्री कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 181 भूखंड वाटपावरील स्थगिती उठवण्यात आली असून उर्वरित 10 प्रकरणांची छाननी सुरू आहे. “आम्ही उर्वरित प्रकरणांवर काम करत आहोत आणि लवकरच निर्णय मिळण्याची आशा आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले. शिंदे-फडणवीस सरकारने दिलेल्या स्थगितीमुळे सुमारे 12 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे प्रकल्प रखडले, अशी टीका विरोधकांनी सरकारवर केली होती.

नाशिक तालुक्यात सरपंचपदासाठी ‘यांनी’ उधळला विजयाचा गुलाल

गेल्या काही दिवसांपासून उद्योग विभागाने प्रत्येक प्रस्तावाची छाननी करून भूखंड वाटपावरील स्थगिती उठवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी देताना शिंदे यांनी 181 भूखंड वाटपावरील स्थगिती उठवली. त्यामुळे पुन्हा एकदा 10 प्रस्तावांची छाननी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत भूखंड वाटपावरील स्थगिती उठवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.