Take a fresh look at your lifestyle.

डीटीएच आणि केबल चॅनेल दरांबाबत मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ग्राहकांना बिलामध्ये दिलासा मिळणार

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : हल्ली डीटीएच सेवेद्वारे विविध टीव्ही चॅनेलचा प्रेक्षकवर्ग आनंद घेताना दिसून येतात याशिवाय स्थानिक पातळीवर केबल सेवेचा पर्याय देखील उपलब्ध असतो. सध्या ग्राहकांना पॅकेज निवडीनुसार पे चॅनल्सवर ३३ टक्क्यांपर्यंत सूट देण्याचा पर्याय उपलब्ध आहे, मात्र पुढील वर्षी या सवलतीला ४५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याने, ग्राहकांना डीटीएच किंवा केबल करिता द्यावयाच्या बिलात कपात होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ‘ट्राइ’ ने याबाबत महत्वपूर्ण टॅरिफ ऑर्डर मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतल्याने बिल कपात केली जाणार आहे.

‘युपीआय’द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी पुढे आली महत्वपूर्ण माहिती; ‘हा’ नवीन बदल लागू होण्याची शक्यता

‘ट्राइ’ ने याबाबतीत नुकतीच अधिसूचना जारी केली असून यानुसार १९ रुपयांपेक्षा कमी किमतीचे चॅनेल एकाच प्लॅनमध्ये समाविष्ट केल्या जाऊ शकणार आहे. आगामी वर्षी १ फेब्रुवारी २०२३ पासून हे सर्व नवीन नियम लागू होणार असल्याची माहिती अधिसूचनेद्वारे देण्यात आली आहे. यामुळे पे चॅनेलची किंमत वितरकाने दिलेल्या सवलतीच्या आधारे आकारण्यात येणार आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महापालिकांची नव्याने प्रभाग रचना होणार; नगरविकास विभागाचे आदेश

सध्या वितरकांना त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या पे चॅनेलच्या संपूर्ण माहितीचा अहवाल १६ डिसेंबर पर्यंत द्यावा लागणार असून, यामध्ये पे चॅनेलची भाषा, नाव, दरमहा चॅनेलचा दर, प्लॅनची रचना तसेच किमतींमधील बदलांचा साचेबंद अहवाल दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे सादर करावा लागणार आहे. यानुसार, येत्या काळात १ फेब्रुवारी पूर्वी चॅनेलच्या नव्या किमती ठरविण्यात येणार असून पर्यायाने पॅक देखील स्वस्त होणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.