Take a fresh look at your lifestyle.

देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार; उद्धव ठाकरे थेट मोदींना भिडणार?

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : उद्धव ठाकरेंना प्रमुख विरोधी नेता बनवण्याची योजना असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. आगामी 2024 च्या निवडणुकीत मोदींचा विजयी रथ रोखण्यासाठी विरोधक मोर्चेबांधणी करत आहेत. महाराष्ट्रात भाजपने शिवसेना पक्ष उद्ध्वस्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ममता बॅनर्जी आणि नितीशकुमार यांच्या लीगमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांना दिलासा नाहीच; सुनावणी पुन्हा लांबणीवर

आगामी काळात उद्धव ठाकरेंना भाजपच्या कार्यशैलीचा ‘बळी’ म्हणून दाखवण्याची योजना आखण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख विरोधी पक्षनेतेपदी उद्धव ठाकरे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दिल्लीकरांशी दोन हात करत असताना उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील लोकांची अभूतपूर्व सहानुभूती मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

भविष्यात ‘मिहान’ला सुगीचे दिवस येणार : नितीन गडकरी

विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेना या दोन्ही हिंदुत्ववादी संघटना आहेत. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असल्यामुळे ते हिंदुत्वाचे कणखर विचार करणारे नेते म्हणून ओळखले जातात. 2024 ची निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढायची ठरवली, तर त्यासाठी उद्धव ठाकरे हा चांगला पर्याय ठरू शकतो. याचाच फायदा म्हणून उद्धव ठाकरे व्हिक्टिम कार्ड वापरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्यांचा भविष्यात उद्धव ठाकरेंना किती फायदा होणार, हे पाहणे आता जास्त महत्त्वाचे ठरणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

ऑन धिस टाईम मीडिया आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर  आणि  इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ON THIS TIME (OTT) यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leave A Reply

Your email address will not be published.