Take a fresh look at your lifestyle.

खाद्यतेलांच्या दरात मोठी घसरण; सीमा शुल्क रद्द केल्याचा परिणाम

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : केंद्र सरकारने खाद्यतेलावरील सीमा शुल्क रद्द केल्यामुळे तेलाच्या आयातीत वाढ झाली असून त्याचा परिणाम दरघसरणीवर झाला आहे. नवीमुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत खाद्यतेलाचे दर गेल्या दोन महिन्यांत २० ते २५ टक्क्यांनी उतरले आहेत, तर दररोज तेलाच्या प्रतिकिलो दरात एक ते दोन रुपयांची घट होत आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे डिसेंबर- जानेवारीपासून खाद्यतेलाचा भडका उडाला होता तेलाची आयातच थांबल्याने दरवाढ होत होती. परंतु आता सूर्यफूल १८० १४०-१४५सोयाबीन १४०-१४५ १२३-१२५ पामतेल १३०-१३५ १०० शेंगदाणा तेल १८०-१८५ १८०-१८५ तेलावरील सीमा शुल्क रद्द करण्यात आल्याने तेलाचे दर जेवढी मागणी असेल, तेवढेच तेल व्यापारी खरेदी करत आहेत.

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार- उद्धव ठाकरे

सरकारने तेलावरील सीमा शुल्क रद्द केले आहे. त्यामुळे सणासुदीच्या हंगामात तेलाचे दर घसरत आहेत, असे तेलव्यापाऱ्यांनी सांगितले.देशात वर्षाला २५० टन खाद्यतेलाचा वापर होतो. त्यापैकी १४० टन तेल साठा आयात केला जातो. कोरोना साथीच्या काळात तेल उत्पादन कमी झाले होते आता ते वाढत आहे सीमा शुल्क १० ते १५ टक्के होते. ते रद्द केल्यामुळे दररोज तेलाचे दर एक ते दोन रुपयांनी कमी होत आहेत.

दिवाळीपर्यंत तेलाचे दर आणखीन कमी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीतील तेलाचे व्यापारी तरुण जैन यांनी दिली येथून तेलाची आयात होत आहे. तसेच, युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची २० टक्के ते ३० टक्के आयात सुरू झाली आहे. पामतेलाची महिन्याला ८ ते ९लाख टन अर्थात ६० टक्के आयात होत आहे. एकूण गरजेपैकी ६०टक्के तेल आयात करण्यात येते, तर देशातील तेलउत्पादनातून उर्वरित ४० टक्के गरज भागवली जाते.

महाराष्ट्र सरकारच्या चूकीच्या धोरणाचा राष्ट्रवादीकडून निषेध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

देश आयात तेलावर अधिक अवलंबून आहे.शेंगदाणा तेलाचे दर चढेच अन्य खाद्यतेलांचे दर उतरत असले तरी शेंगदाणा तेलाचे दर मात्र चढेच आहेत. चीनमध्ये शेंगदाणे आणि त्याच्या तेलाची निर्यात अधिक प्रमाणात होत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमधून महिन्याला दोन हजार मेट्रिक टन शेंगदाणा तेलाची निर्यात होत आहे त्यामुळे शेंगदाणा तेलाचे प्रतिकिलो दर १८०-१८५ रुपयेच आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.