Take a fresh look at your lifestyle.

रक्षाबंधनाच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; आजच खरेदी करा दागिने

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : सराफा बाजारात गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. काल सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. त्यामुळे आज त्याचे दर कमी झाले आहेत. 24 कॅरेट सोने आज 52 हजार 224 रुपये तोळ्याने विकले जात आहे. तर एक किलो चांदी 58 हजार 436 रुपये झाली आहे.

आजचा सोन्याचा दर 52 हजार 224 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. दरम्यान, काल सोन्याचा भाव 52 हजार 348 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. त्यामुळे आज सोन्याचा दर 124 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला.

वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी; आता फास्टॅग होणार महाग! वाचा सविस्तर…

दरम्यान, आजही सोन्याचा दर 3 हजार 976 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला. त्यावेळी सोन्याचा भाव 56 हजार 200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

‘या’ दरातही घसरण

आज चांदीचा दर 58 हजार 436 रुपये प्रति किलोवर खुला करण्यात आलाय. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 58 हजार 444 प्रति किलोवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीचा भाव किलोमागे आठ रुपयांच्या घसरणीसह खुला करण्यात आलाय.

‘जगात भारी माझी नऊवारी’ स्पर्धेला सुरुवात; महिलांचा लाभतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

तपासा सोन्याची शुद्धता…

सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने अ‍ॅप बनवले आहे. ग्राहक ‘BIS Care App’द्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबत कोणतीही तक्रार करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतही तत्काळ माहिती मिळणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.