Take a fresh look at your lifestyle.

होळीच्या सणाला सरकारचं मोठं गिफ्ट; तब्बल १.६५ करोड नागरिकांना सिलेंडर मोफत देणार

0
ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजपने विधानसभा निवडणुकीच्या आपल्या ठराव पत्रात उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना होळी आणि दिवाळीला मोफत सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. निवडणुकीत बहुमत मिळालेल्या भाजपने पहिल्याच होळीला ती देण्याची तयारी चालवली आहे. सध्या राज्यात उज्ज्वला योजनेचे १.६५ कोटी लाभार्थी आहेत. अशा स्थितीत हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकारवर 3000 कोटींचा बोजा पडणार आहे. संकल्प पत्रात होता समावेश

मोफत रेशन देण्याची योजना पुढे नेण्याची घोषणा

सरकार मोफत रेशन योजनेतही वाढ करणार आहे. यासाठीही सरकारने अन्न व रसद विभागाकडून प्रस्ताव मागवला आहे. याआधीही सरकार डिसेंबरपासून मोफत रेशन देत आहे. त्याची मुदत मार्च महिन्यात संपणार आहे. राष्ट्रीय खाद्य सुरक्षेच्या अंतर्गत मिळणारे गहू आणि तांदूळ निशुल्क दिलं जाणार आहे. सोबतच चणे, मीठ आणि तेल देखील सरकार देणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उज्ज्वला योजनेंतर्गत दोन सिलिंडर आणि मोफत रेशन देण्याची योजना पुढे नेण्याची घोषणा केली होती.

अन्न व रसद विभागाने सरकारकडे प्रस्ताव पाठवला
भाज्या, अंडी, मासे सगळ्याच गोष्टी महागल्या आहेत. या सगळ्या महागाईने पिचलेल्या सामान्यांना सरकारचं मोठं गिफ्ट आहे. होळीच्या उत्सवाला प्रत्येकाला मिळणार मोफत सिलेंडर. अन्न व रसद विभागाने याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला असून, त्यानंतर वित्त विभागाकडून अंदाजपत्रक जारी करून जिल्ह्यांमध्ये मोफत सिलिंडरचे वाटप केले जाणार आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.