Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात मोठी उसळण; सेन्सेक्सने गाठला ‘इतक्या’ हजारांचा टप्पा

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

Share Market : शेअर बाजारात अजूनही तेजीची चिन्हे दिसत आहेत. आठवड्याच्या व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात (Share Market) खरेदीचा जोर दिसून येत आहे. आज बँकिंग शेअर तेजीत आहे. बँक निफ्टीने 40 हजार 500 चा टप्पा पार केला. बाजार सुरू होताच सेन्सेक्सने (Sensex) 60 हजारांचा टप्पा गाठला. त्यानंतर काही प्रमाणात घट झाली.

आज शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स 357.53 अंकांनी वाढून 60 हजार 045 अंकांवर उघडला. NSE चा निफ्टी 124.60 अंकांनी वाढून 17 हजार 923 अंकांवर उघडला. सकाळी बाजारात विक्रीमुळे निर्देशांक घसरला. सकाळी 9.50 च्या सुमारास सेन्सेक्स 260 अंकांनी वाढून 59 हजार 948.78 वर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 91 अंकांच्या वाढीसह 17 हजार 890.10 अंकांवर व्यवहार करत होता.

हा परतीचा पाऊस नसून मान्सूनच; हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती

बाजार उघडताच सेन्सेक्सने (Sensex) 60 हजार 100 चा टप्पा ओलांडला. मात्र, अल्पावधीतच सेन्सेक्स निर्देशांक 60 हजार अंकांच्या खाली घसरला. तर, निफ्टीने 17 हजार 925 अंकांची पातळी ओलांडली होती. काही काळानंतर त्यात घट झाली. सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी पॉवरग्रीड आणि एनटीपीसीचे भाव घसरले. तर, निफ्टीमधील 50 कंपन्यांपैकी 46 कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाली. तर, चार कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.

भारती एअरटेल, इंडसइंड बँक, ओएनजीसी, एचडीएफसी आणि कोटक महिंद्रा बँकेतील शेअर्स तेजीत आहेत. सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब, टायटन, आयटीसी, मारूती, महिंद्रा अँड महिंद्रा, एल अँड टी, विप्रो, टाटा स्टील, एसबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, अ‍ॅक्सिस बँक, इन्फोसिसच्या शेअर दरात वाढ झाली आहे. प्री-ओपनिंग सेशनमध्ये शेअरच्या किमतीत निफ्टीमध्ये 137 अंकांची तेजी पाहायला मिळाली. तर सेन्सेक्सने 60 हजारांचा टप्पा ओलांडला होता.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.