Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीतून भाजपची माघार; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले स्पष्टीकरण

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने नुकतीच माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणुकीच्या रिंगणात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भावनिक आवाहन करणारे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहले होते व भाजपने या निवडणुकीत माघार घ्यावी अशी विनंती केली होती. दरम्यान राज ठाकरे यांच्या पत्रानंतर आज सकाळपासून राजकीय हालचालींना वेग आला होता. नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतीत अधिकृत घोषणा केली असून भाजप अंधेरी पूर्व मतदार संघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणे पडले महागात; संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

भाजपतर्फे मुरजी पटेल यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, आज दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली होती. त्यामुळे अखेर मुरजी पटेल यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपने माघार घेतल्याने ऋतुजा लटके यांचा एकतर्फी विजय निश्चित झाला आहे, कारण आता विरोधी उमेदवार म्हणून कुणाचेच कडवे आव्हान त्यांना उरले नाही.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.