Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : गुजरातमध्ये पुल कोसळून मोठा अपघात! 400 लोक पाण्यात पडल्याची भीती

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

गांधीनगर : गुजरातमधील (Gujarat) मोरबी भागात रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे मच्छू नदीत एक केबल पूल कोसळला (Bridge Collapse), ज्यामध्ये 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघाताच्या वेळी पुलावर सुमारे 400 लोक उपस्थित होते. यापैकी 400 हून अधिक लोक नदीत पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. दुरूस्तीनंतर हा पूल नुकताच पाच दिवसांपूर्वी पुन्हा लोकांसाठी खुला करण्यात होता. पूल रविवारच्या सुट्टीमुळे गजबजलेला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास पूल तुटला.

भास्कर जाधव यांना अटक होणार? राणेंप्रकरणी कुडाळ पोलिसांनी बजावली नोटीस

मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल सुमारे सात महिन्यांपासून बंद होता. केबल ब्रिज बराच जुना असून नूतनीकरणानंतर केवळ 5 दिवसांपूर्वीच तो सुरु करण्यात आला होता. नूतनीकरणानंतरही एवढा मोठा अपघात घडल्याने लोकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.या अपघातानंतर केबल पुलाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सत्ताधारी-विरोधकांमधील वाद चिघळणार! आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर?

मोरबी येथील अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा करून या अपघातातील लोकांच्या बचाव कार्यासाठी तात्काळ पथके तयार करण्यास सांगितले. तसेच परिस्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवण्यास आणि बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत करण्याचे पीएम मोदींकडून सांगण्यात आले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.