Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : दाऊद टोळीशी संबंधित पाच जणांच्या मुसक्या आवळल्या; मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : कुख्यात गुंड आणि तस्कर तसेच मुंबई बॉम्बस्फोटाचा प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम सध्या भारताबाहेर आश्रय घेऊन आहे तरी त्याचे हस्तक व या गँगशी संबंधित गुंड सध्याही भारतात सक्रिय आहेत. अशाच गुंडांवर धडक कारवाई करत त्यांना अटक करण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. सदर व्यक्तींना खंडणी प्रकरणी अटक झाल्याचे समजते, दाऊदचा हस्तक छोटा शकील तसेच रियाज भाटीला अटक केल्यानंतरची ही मोठी कारवाई समजण्यात येते. यावेळी मुंबई गुन्हे शाखेने एकूण पाच व्यक्तींना अटक केली असून त्यांची नावे पापा पठाण, अमजद रेडकर, फिरोज लेदर, अजय गंडा, समीर खान अशी आहे.

अखेर ठरले, पालघर साधू हत्याकांडाची चौकशी सीबीआय करणार; राज्य सरकारची स्वीकृती

अटक केलेले सर्व गुंड हे सराईत खंडणीबहाद्दर असून वर्सोवा येथील एका व्यावसायिकाची त्यांनी ३० लाखाची कार तसेच साडेसात लाख रुपयाची रोकड लुटत खंडणी वसूल केली होती. पोलिसांनी खाकी दाखवताच चौकशीतून सर्व माहिती पुढे आली आहे, सध्या चौकशी सुरु असून आणखी महत्वपूर्ण माहिती या पाच गुन्हेगारांकडून प्राप्त होण्याची शक्यता आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.