Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत विविध वेळेला महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीरपर्यंत भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले आहेत. यामध्ये मध्यरात्री साधारणतः २ वाजून २१ मिनिटांनी कोल्हापूरच्या पूर्वेस सुमारे १७१ किलोमीटरच्या परिसरात ३.९ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर पहाटे ३ वाजून २८ मिनिटांनी जम्मू-काश्मीरला ३.४ इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. याबाबतची अधिकृत माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या; मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

सदर भूकंपाचे कनेक्शन अफगाणिस्तानपर्यंत (Afghanistan) असून काबूल शहरामध्ये मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास ४.३ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. तीनही भागांमध्ये जाणवलेल्या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली विविध अंतरावर होते. अफगाणिस्तान येथे झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ८० किलोमीटर इतक्या अंतरावर होता. महाराष्ट्रात झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली १० किलोमीटर अंतरापर्यंत होता.

केंद्राचा मोठा निर्णय; ‘या’ कार्डवर मिळणार सरकारी आरोग्य विमा योजनांचा लाभ

जम्मू-काश्मीरमध्ये कटरा जिल्ह्याच्या ६२ किलोमीटर अंतरावर ईशान्य -उत्तर दिशेला भूकंपाचे धक्के जाणवले ज्याचा केंद्रबिंदू जमिनीखाली ५ किलोमीटर अंतरावर होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या भूकंपामुळे झालेल्या जीवित अथवा मालमत्ताहानी बाबतीत कुठलीही अधिकृत माहिती पुढे आली नाही आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.