Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : रशिया-युक्रेन दरम्यान संघर्षात वाढ; भारतीयांना युक्रेन सोडण्याच्या दूतावासाच्या सूचना

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : मागील सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरु असलेले रशिया -युक्रेन शमणार असे वाटत असताना अचानक परिस्थितीमध्ये मोठे बदल निर्माण झाले आहे. आतापर्यंत सावध भूमिका बाळगणारा जगातील शक्तिशाली देश रशिया आता आक्रमक भूमिकेचा अवलंब करत असून रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन निर्णायक युद्ध भूमिकेत दिसत आहे. याअंतर्गत ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनधील चार ठिकाणांवर मार्शल लॉ लावला आहे. कुठल्याही क्षणी रशिया टोकाची भूमिका घेत मोठा हल्ला युक्रेनवर करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

यंदा दिवाळीत तरुणाईला पंतप्रधान देणार विशेष गिफ्ट; रोजगार मेळाव्याद्वारे ७५,००० नोकऱ्या देण्यात येणार

सध्या सुरक्षेचा मोठा प्रश्न युक्रेनमध्ये निर्माण झाला असून भारतीय दूतावासांनी भारतीयांना युक्रेनमध्ये येण्यास मनाई केली आहे तसेच जे लोक सध्या युक्रेनमध्ये आहे त्यांना तातडीने युक्रेन सोडण्याची ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. हा आदेश तातडीने देश सोडून जाण्याबतीत देण्यात आला असून परिस्थिती आणखी भीषण होण्यापूर्वी घेण्यात आलेला हा निर्णय आहे.

गुगलचे ‘हे’ भन्नाट ॲप विशेष अलर्ट सुविधेसह सुसज्ज; पालकांची चिंता मिटणार

रशियाच्या निर्णायक हल्ल्यात भीषण शस्त्रास्त्रांचा वापर केला जाऊ शकतो, अगोदरच या युद्धामुळे अनेक जणांना बळी गेला आहे. त्यामुळे भारतीयांनी प्रसंगावधान राखत तातडीने युक्रेन सोडण्याची वेळ आल्याचे दूतावासाकडून सांगण्यात आले आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.