Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : ‘या’ योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर मोठा बदल

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : शेती प्रधान देश म्हणून संपूर्ण जगात भारताची ओळख आहे. देशातील मोठा वर्ग शेतीवर अवलंबून असून त्यावरच अनेक जण आपला उदरनिर्वाहही करतात. हरित क्रांतीच्या दिशेने वाटचाल करीत असतांना सरकारकडून देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढी साठी अनेक प्रयत्नही केले जात आहेत. त्यापैकी एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान योजना. या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात.

एकंदरीत दरवर्षी 6 हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो. 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतला असून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर ११ हप्ते पाठवण्यात आले आहेत. किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर बदल करण्यात आल्यानंतर शेतकरी आता १२ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

७२ तासांत ५२ बालकांवर यशस्वी हृदय उपचार; ‘एसएमबीटी हॉस्पिटल’ सर्वसामान्यांसाठी ठरतेय वरदान

वेबसाईटवरील बदल काय ?

आता पीएम किसान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून ई-केवायसीच्या तारखेविषयी असलेले अपडेट काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे ई-केवायसीचा पर्याय काढून घेतला आहे, असा सवालही उपस्थित होत आहे.

लाभार्थ्यांमध्ये होणार घट

पीएम किसान सन्मान निधी लाभार्थ्यांच्या जमिनीच्या नोंदींची पडताळणीही सुरू करण्यात आली असून पडताळणीत अनेक शेतकरी मात्र यामुळे अपात्र केले गेले होते. त्यामुळे अशा अपात्र शेतकऱ्यांना नोटीस देऊन चुकीच्या पद्धतीने मिळालेल्या सर्व हप्त्यांची वसुली केली जात आहे. यामुळे लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.