Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : NSE चे माजी प्रमुख रवी नारायण यांना ईडीकडून अटक

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

NSE : नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) चे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (MD & CEO) रवी नारायण यांना कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने अटक केली आहे.

एक नव्हे तर चार प्रकारचे आधारकार्ड उपलब्ध; वाचा काय आहे फीचर्स आणि फायदे

कथित को-लोकेशन घोटाळा आणि बेकायदेशीर फोन टॅपिंग या दोन प्रकरणांचा सीबीआयकडून समांतर तपास सुरू होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चे माजी प्रमुख रवी नारायण यांचा यात सहभाग आहे का? याची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू होती. यानंतर, अखेर असे समजते की ईडीने फोन टॅपिंग प्रकरणी रवी नारायण यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) फौजदारी कलमांतर्गत अटक केली आहे.

भारताला मिळाला सिंगापूर-अमेरिकेकडून सर्वाधिक FDI; ‘या’ यादीतून चीनचे नाव गायब

ईडीने यापूर्वी कथित फोन टॅपिंग प्रकरणात नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे माजी प्रमुख आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांना अटक केली होती. या प्रकरणांचा समांतर तपास करणाऱ्या सीबीआयने (CBI) चित्रा रामकृष्ण यांना ‘को-लोकेशन’ घोटाळ्यात अटक केली होती.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.