Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगलेच अस्मानी संकट निर्माण करणारे ठरले, ज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरवर्षी सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येते, यापैकी अनेक शेतकरी नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करतात. अशाच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने गोड बातमी दिली आहे. या अनुषंगाने वर्ष २०१७ ते २०२० या साधारणपणे तीन वर्षात ज्या शेतकऱ्यांनी कुठल्याही दोन कर्जाची जर नियमितपणे परतफेड केली असेल, तर अशा सर्व शेतकऱ्यांना सरकार तीन टप्प्यात प्रोत्साहन अनुदान राशी पन्नास हजार रुपये देणार आहे. याचा लाभ राज्यातील २३ लाख शेतकऱ्यांना होणार असून हे सर्व शेतकरी या तीन वर्षात नियमित कर्जाची परतफेड करणारे ठरले आहे.

१२ आमदार नियुक्ती व राज्य सरकार शपथपत्र प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी

सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत ८ लक्ष २९ हजार शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांना आधार कार्ड प्रमाणिकरणानंतर येत्या १८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यातील अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे. इथे अडसर बाब म्हणजे सध्या १८ जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूका सुरु आहे, त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नोव्हेंबर मध्ये पहिल्या टप्प्यातील प्रोत्साहन अनुदान वाटप करण्यात येईल. या जिल्ह्यातील अनुदानास पात्र शेतकऱ्यांचा आकडा १४ लक्ष ८५ हजार इतका मोठा आहे.

कामात दिरंगाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला मनपा आयुक्तांनी केले बडतर्फ

इथे विशेष काळजी सरकारतर्फे घेण्यात येणार असून प्रोत्साहन अनुदानापोटी देण्यात येणारी रक्कम ही शेतकऱ्यांना बचत खात्यात वर्ग केली जाणार आहे, त्याबाबत विशेष सूचना बँकांना देण्यात आल्या असून, जेणेकरून त्यांच्याकडून कर्ज म्हणून ही राशी देण्यात येऊ नये. यंदा अतिवृष्टी, नापिकी, पिकांचे किडीमुळे नुकसान इत्यादी कारणाने अनेक शेतकरी नुकसानग्रस्त झाले आहे, त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणारी अनुदान राशी त्यांची दिवाळी गोड करणार हे निश्चित आहे. परंतु ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ज्या शेतकऱ्यांना पुढील महिन्यात अनुदान मिळणार आहे, त्यांना दुधाची तहान ताकावरच भागवावी लागणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.