Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी! ईडीच्या कारवाईत, नीरव मोदीची तब्बल 253 कोटींची मालमत्ता जप्त

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – अनेक महिन्यांपासून फरार असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी देशभरात सर्वपरिचित आहे. नीरव मोदीविषयीआतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नीरव मोदीशी संबंधित सर्व कंपन्यांची हिरे, दागिने आणि बँक ठेवींसह एकूण 253.62 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी याबाबतची माहिती दिली.

“गृहमंत्रीपद मिळाल्यास सत्तेत सहभागी होण्याचा विचार करू” – अमित ठाकरे

नीरव मोदीने त्याचा काका मेहुल चोक्सी याच्यासोबत मिळून पंजाब नॅशनल बँकेत हेराफेरी केली होती. नीरव मोदी गीताजली या ब्रँड नावाने हिऱ्यांचा व्यवसाय करत असून नीरव मोदीशिवाय मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या, आयपीएलचे संस्थापक ललित मोदी हेदेखील यावेळी ब्रिटनमध्ये आहेत. भारत सरकारने त्यांना फरार घोषित केले असून त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग आणि फसवणूक केल्याप्रकरणी तपास सुरू आहे.

यासंबंधी केंद्रीय एजन्सीने एक निवेदन दिले आहे. ज्यात जप्त करण्यात आलेली ही सर्व मालमत्ता हाँगकाँगमध्ये आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. निवेदनानुसार, हाँगकाँगमध्ये नीरव मोदी समूह आहे. ईडीला त्या समूहाअंतर्गतच काही मालमत्ता आढळली आहे. यासोबतच तिथल्या बँक खात्यांमध्ये ठेवलेल्या रकमाही समोर आल्या आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

दरम्यान, नीरव मोदीच्या मालमत्तेवर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार तात्पुरती जप्ती आली आहे. नीरव मोदी सध्या ब्रिटनच्या तुरुंगात असून पंजाब नॅशनल बँकेच्या दोन अब्ज डॉलर्सच्या फसवणुकीतील तो मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.